या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
शादा म जयराय प्रकरण ५ COVER व्यवसाय आणि समाज आपला व्यवसाय आपण उत्तम प्रकारे करण्यात समाजाचे हितही आपोआपच साथले जात असते, ह्याविषयी वसंतरावांच्या मनात जराही शंका नव्हती. ट्रक्सने केली जाणारी मालवाहतूक हे वसंतरावांचे मुख्य कार्यक्षेत्र होते. मालवाहतुकीचा हा व्यवसाय औद्योगिकीकरणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, शरीरात रक्ताभिसरणाला जे महत्त्व आहे तेच औद्योगिकीकरणात वाहतुकीला आहे. ५ मार्च १९७१ रोजी घाटगे-पाटील कंपनीच्या रौप्यमहोत्सवप्रसंगी कोल्हापूर येथे केलेल्या आपल्या भाषणात हा मुद्दा स्पष्ट करताना वसंतराव म्हणाले होते, व्यवसाय आणि समाज । ११७ ।