Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पार्ट्स आम्ही सप्लाय करायचो. त्यांची मागणी खूप मोठी असे. घाटगेसाहेब प्रत्येक प्रोसेसचा अगदी खोलात जाऊन अभ्यास करायचे. काहीही अडचण आली, तरी 'रूट कॉज काय आहे ते शोधा' असा त्यांचा सल्ला असे. " असा एक प्रसंग माझ्या कायम लक्षात राहिला आहे. नेहमीप्रमाणे एकदा ते मशीन शॉपमध्ये आपला राऊंड मारत होते. तेव्हा एक मशीन त्यांना बंद पडलेलं दिसलं. त्यांनी चौकशी केली तेव्हा 'इलेक्ट्रिकल फॉल्ट आहे' असं त्यांना सांगण्यात आलं. आठ-दहा दिवसांनंतर पुन्हा एकदा राउंड मारताना तेच मशीन बंद असल्याचं त्यांनी बघितलं. 'इलेक्ट्रिकल फॉल्ट आहे' असंच त्यांना पुन्हा एकदा सांगण्यात आलं. 'पुन्हा तोच फॉल्ट? याचा अर्थ मोटरवर लोड जास्त येतोय. तो का ज येतोय ते आधी शोथा.' असं म्हणून ते पुढे गेले. त्यानंतर आम्ही पंप आणि मोटर बाहेर काढून सगळं नीट तपासलं. पंपात परत जाणाऱ्या ऑईलसाठी एक फिल्टर असतो व तो फिल्टर इथे निसटला होता. त्यामुळे सगळा कचरा आणि बोरिंग पंपातच अडकून राहत होती. आम्ही तो फिल्टर नीट दुरुस्त करून बसवला आणि त्यानंतर ते मशीन उत्तम चालायला लागलं. 'कुठलीही अडचण आली तर रूट कॉज काय असेल ते आधी शोधा' ह्या साहेबांच्या सांगण्याचं महत्त्व तेव्हा आमच्या नेमकं लक्षात आलं. “घाटगेसाहेबांचं आणखी एक वेगळेपण म्हणजे दुसऱ्या छोट्या छोट्या सप्लायर्सच्या अडचणींचा ते कधीही गैरफायदा घेत नसत. आम्ही जसा इतरांना माल सप्लाय करायचो, तसेच आम्हांला माल सप्लाय करणारेही अनेक जण होतेच, काम मिळवण्यासाठी खूपदा छोटे छोटे उद्योजक आपापल्या आयटेमची अगदी कमी किंमत कोट करायचे. त्या आयटमचा उत्पादनखर्चदेखील त्यातून भरून निघेल का, याचीच आम्हांला शंका वाटायची. अशावेळी घाटगेसाहेब स्वतःहून त्यांना रेट वाढवून द्यायचे. कोल्हापूरच्या उद्यमनगरात अनेक छोट्या छोट्या कारखान्यांना आमचं काम सब काँट्रॅक्ट म्हणून दिलं जाई. पण अगदी योग्य दराने. दुसऱ्याला गरज आहे म्हणून त्याला खाली खेचायचं ही त्यांची वृत्ती नव्हती. फारच थोड्या उद्योजकांमध्ये ही दृष्टी आढळते. “१९७३ ते १९८६ अशी तेरा वर्ष मी घाटगेसाहेबांकडे नोकरी केली. जिद्द म्हणजे काय, हे मी त्यांच्याकडून शिकलो. कष्ट करायची ज्याची तयारी आहे, त्याला नेहमीच भरपूर वाव असतो असं ते म्हणत. पुढे मी उद्योगभरारी । १११ ।