पत्ता, पासपोर्ट नंबर वगैरे. आपल्या आजारपणाचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. " मुंबई येथील एक ट्रॅव्हल एजंट विजय सकपाळ यांच्याशी वसंतरावांचा चांगला स्नेह होता व ह्या दौऱ्याची आखणी त्यांनीच केली होती. तब्येत बरी नसताना हा प्रवास त्यांना कसा झेपणार ह्याची सकपाळ यांना खूप काळजीच होती; पण प्रत्यक्षात ह्या प्रसंगी वसंतरावांच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय देणारा एक प्रसंग घडला. सकपाळ म्हणतात, 'ह्याच प्रवासात मी व माझी पत्नी स्नेहल पॅरिसच्या एअरपोर्टवर त्यांना भेटलो. ही अगदी अचानक झालेली भेट होती. साहेबांनी युरोपातच घेतलेली एक टोपी घातली होती व तिला पिसं होती. अंगात लांब ओव्हरकोट होता. आम्हांला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांचीही परिस्थिती आमच्यासारखीच झाली होती. आम्ही थावत जाऊन त्यांना भेटलो. वाकून नमस्कार केला. माझ्या पाठीवर हात फिरवून शाबासकी देत ते म्हणाले, 'तुमच्यामुळे सगळं शक्य झालं, ट्रीप उत्तम चालली आहे.' हे ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.' अशा अनेक प्रसंगी वसंतरावांची जिद्द आणि आत्मविश्वास दिसून येई. जयंत कुलकर्णी म्हणजे घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे चीफ फायनान्शियल ऑफिसर. ते सांगत होते, " मी मूळचा बत्तीस शिराळ्याचा. वसंतराव मला जयंत म्हणून हाक मारायचे. त्यांचा स्वभाव अतिशय कष्टाळू होता. कुठल्याच कामाचा ते कधी कंटाळा करत नसत. मला आठवतं, १९७२-७३ साली एका मीटिंगसाठी त्यांना दिल्लीला जायचं होतं. एस्कॉर्ट कंपनीबरोबर ती मिटिंग ठरली होती. त्या मीटिंगसाठी म्हणून रात्रभर जागून त्यांनी एक अकरा पानी स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स स्वतःच्या हाताने लिहून काढलं होतं. कुठल्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर एवढी मेहनत घेईल? कंपनी अॅक्टचा त्यांनी स्वतः डिटेल अभ्यास केला होता. त्यामुळे कोणत्या प्रसंगी काय करावं लागेल, हे त्यांना पक्कं ठाऊक असायचं. “शेवटी जेव्हा त्यांच्या तब्येतीच्या अडचणी सुरू झाल्या, अगदी चेकवरची सहीदेखील नीट करता येईना, तेव्हा सतत घोटून घोटून त्यांनी व्यवस्थित सही करायला सुरुवात केली होती, उठताना, बसताना त्रास वसंतवैभव | १०० |
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/१०२
Appearance