पान:वनस्पतीविचार.djvu/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

arrrrraramananamanianawarananamannainine ६४ वनस्पतिविचार. [प्रकरण marrrrrrram असल्या वाढत्या पेशींपासून होऊन त्यास पुढे कायम व्यवस्थित स्वरूप आले असते. वाढत्या कोंबाचा पातळ भाग आडवा कापून सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहण्याकरितां पूर्वीप्रमाणे तयार करावा. कापण्याचे पूर्वी पाने सर्व काढून केवळ कोंबाचा भाग पहावयास घ्यावा. सारख्या आकाराचे समपरिमाण पेशीजाल ( Parenchyma ) सूक्ष्मयंत्रामध्ये दिसेल. पेशीतील जीवनकण अथवा केंद्रे सोडून पेशीजालरचनेकडे लक्ष्य द्यावे. ह्यांत तीन प्रकारच्या पेशजिालाच्या मांडणी कमी-अधिक फरक होत जाणा-या आढळतात, कोवळ्या स्थितिमध्ये १ त्वचापदर (Dermatogen) २ अंतरालपदर (Periblem) व मध्यपदर (Plerome) अशा तीन प्रकारची पेशीजाले आढळतात. व ह्या तीन कोवळ्या जालांत इतर पोटपेशी जालांचा अंतर्भाव होतो. पहिल्या त्वचापदरापासून Dermatogen बाह्यत्वचा Epidermis केससंरक्षक पापुद्रे अथवा आवरणे (Scales) उत्पन्न होतात. दुसरा अंतरालपदर Periblem समपरिमाण असून त्यापासून साल (Cortex) अंतरत्वचा Endodermis वगैरे उत्पन्न होतात. पानांचा उगम ह्याच अंतराल पदरा (periblem) पासून होतो. तिसरा मध्यपदर (plerome) विशेष महत्त्वाचा असतो. परिवर्तुळ (Pericycle)संवर्धक पदर (Cambium)वाहिनीमय ग्रंथी (Vascularbundle) मंथ्यंतराल पदर Medullary rays, काष्ट Xylem तंतुकाष्ट (Phloem) व भंड (Pith) ही सर्व जालें तिस-या मध्यपदरा(plerome) पासून उगम पावतात. परिवर्तुळा ( pericycle ) पासून परिवर्तुळापर्यंत जो वाटोळा भाग उच्च वनस्पतीमध्ये आढळतो, त्यास स्तंभ (Stele) असे म्हणतात. म्हणजे वरील सर्व जालें स्तंभामध्ये अंतर्धान पावतात, व स्तंभाचा उगम ह्या तिसन्या मध्य पदरापासून होतो. प्राथमिक स्थितीत पेशीवर्धक शक्ति सार्वत्रिक असते, पण पुढे ती स्थिति राहत नाही. पेशीवर्धक शक्तीमुळे नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यास संकीर्ण स्वरूप मिळत जाते. निरनिराळी पेशीजाले ह्या पेशीवर्धक शक्तीमुळे उत्पन्न होतात. जशी जशी ती वाढत जातील, तसेतसे त्यांस विशिष्ट संकीर्ण स्वरूप प्राप्त होते. म्हणूनच बीज पेरून कोवळ्या स्थितीत येणा-या रोपड्यांत संकीर्ण जाले आढळत नाहीत. जसजसा रोपडा मोठा होत जातो त्याप्रमाणे प्राथमिक