पान:वनस्पतीविचार.djvu/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वें.]. पेशीजाल ( Tissue ). Fertilization हे सर्व प्रकार वनस्पतीच्या उत्पत्तीसंबंधाचे आहेत. ह्याप्रकाराने वनस्पतीच्या निराळ्या व्याक्त उत्पन्न होतात. ह्या चार प्रकारांव्यतिरिक्त जो प्रथम पेशीविभाग प्रकार सांगितला, त्यायोगाने मात्र पेशींची संख्या अधिक होऊन शरीरवर्धन होते. अथवा वनस्पति लहानाची मोठी होते. बाकी इतर प्रकारांमुळे व्यक्ति संख्या अधिक होते. पेशीविभागाचे योगानें पेशींची संख्या अधिक होऊन त्या व्यक्तींची शरीरवाढ पूर्ण होते. प्रकरण ८ वें. عهع . पेशीजाल. ( Tissue.) मृदुसमपरिमाण पेशीः-(Soft parenchyma) पेशींच्या बाह्य पडयाचा ज्या प्रकारचा वाढण्याचा कल असतो, त्या प्रकारचा आकार पेशीस येतो. सभोवतालची परिस्थिति तसेंच अंतरसजीवतत्त्व ह्या दोन्हीवर पेशींचा आकार अवलंबून असतो. काही पेशी सर्व बाजूंनी सारख्या वाढतात. अशा पेशीस समपरिमाण ( Parenchymatous ) मृदुपेशी म्हणतात. समपरिमाण पेशांच्या भित्तिका पातळ असून बहुतेक ह्यांची लांबी व रुंदी सारखी असते. कोवळ्या लुसलुशित भागामध्ये समपरिमाण मृदुपेशी आढळतात. लंबवर्धक पेशी:-( Prosenchyma ) जसे जसे ते भाग, लांबी, रुंदीमध्ये वाढत जातात, तसे तसे ह्या पेशींत फरक होऊन दुस-या प्रकारच्या पेशी तयार होतात. काही पेशी दोन्ही टोकास अणकुचीदार असतात. त्यांच्या भित्तिका चिवट व कठीण असतात. जेव्हां कर्कोवळी भाग वाढून जुना होऊ लागतो, तेव्हां समपरिणाम पेशींच्या जागी या लंबवर्धक ( Prosenchyma ) पेशींचा प्रादुर्भाव होतो. सर्व पेशींची जाडी सारखी केव्हाही आढळणे शक्य नसते. त्यांत कमीआधिक अंतरघडामोडीप्रमाणे वाढ नेहमी एक प्रकारची राहणे कठीण असते. कांहीं जागी वाढ अधिक जोमाची होऊन दुसरे जागी ती अगदी खुंटलेली