Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें]. पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protaplasm) ५७ वनस्पतीपासून नवीन पेशी जेव्हां तयार होते, त्यावेळेस पेशीच्या वाढीमुळे दोन वेगळ्या व्यक्ति उत्पन्न होतात. अशा ठिकाणी पेशींची संख्या वाढणे अगर पेशी द्विधा होणे म्हणजे नवीन व्यक्ती तयार होणे होय. जेव्हां पेशी द्विधा होण्याचा समय येतो, तेव्हां केंद्रामध्ये विशेष फरक दिसू लागतात. केंद्रांतील भाग व केंद्रबिंदु ( Nucleolus) ह्यांत गडबड होऊन केंद्र केवळ खरसरीत जीवन कणांनी भरून जाते. पुढे कोष्ठयाच्या घरांतील सूत गुंडाळण्याकरितां जें डबल त्रिकोणारुति अवजार असते, त्या प्रकारचा आकार केंद्रास येतो; अथवा इंग्रजी मूळाक्षरापैकी दोन 'व्ही' मूळाक्षरे एकमेकांस उलटी चिकटून जो आकार दिसतो, त्याच प्रकारची आरुति केंद्रास विभाग सुरू झाला असतां येते. ह्या आरुतीत सूक्ष्म जीवनतंतू बुडाकडून अग्राकडे गेलेले दृष्टीस पडतात. तंतूंच्या मध्य भागी अधिक कण जमत गेल्यामुळे तो भाग हळुहळु जाड होत जातो. हा जाड भाग केंद्र द्विधा करणारा मध्यपडदा होय.. हा पडदा दोन्ही बाजंस वाढत वाढत पेशीभित्तिकेस पोहचतो व त्या योगाने ती पेशी पूर्णपणे द्विधा होते, पूर्ण विभाग होण्यापूर्वी केंद्राची दोन शकलें झालेली असतात. पैकी एक एक केंद्र प्रत्येक पेशीत दिसू लागते. एक पेशीच्या दोन पेशी होण्यास मूळ पेशीची जरूरी असते. तसेच मूळ केंद्राशिवाय नवीन केंद्र उत्पन्न होत नाही. वनस्पतीच्या वाढत्या कोंबावरील पेशी झपाट्याने द्विधा होऊन शेंकडों नवीन पेशी अस्तित्वांत येतात व त्यामुळे वनस्पतीची वाढ होते. पेशीच्या कोवळ्या स्थितीत द्विधा होण्याची शक्ति अधिक असून त्यांचे सजीवतत्व ताजे व तरतरीत असल्यामुळे अधिक चंचल असते. ही चंचल स्थिति पेशी विभागास अधिक सोईची असते. ___ साधारण नियम असा आहे की, प्रथम केंद्राचा विभाग होऊन नंतर पडदा मध्यभागी वाढून पेशीविभाग पूर्ण होतो. ह्या नियमास कधी कधी अपवादही सांपडतात; असो, क्षुद्र वनस्पतीमध्ये पडदा प्रथम तयार होऊन नंतर केंद्रोत्पत्ति होते. कधी कधी पेशीतील केंद्राचे वारंवार पुष्कळ विभाग होऊन ती सर्व त्या पेशीत काही काल राहतात. नंतर ती बाहेर पडून त्यापासून अनेक स्वतंत्र पेशी