पान:वनस्पतीविचार.djvu/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ वें]. पेशी (Cell) सजीवतत्त्व (Protoplasm). ५५ असून, कणास निरनिराळे आकार येतात. एरंडीच्या बीजाचे टरफल काढून आंतील पांढ-या पदार्थाचा वस्त्रयाने पातळ भाग कापून सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये पाहण्याकरितां तयार करावा. पाण्याचे थेंबा ऐवजी ग्लिसरीनचा थेंब त्या पातळ भागांवर सोडावा व सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहण्यास सुरुवातकरावी.पेशीमध्ये त्रिकोनी अथवा चतुष्कोनी कण आढळतात व त्यांजवळच वाटोळे कण असतात. ह्या त्रिकोनी किंवा चतुष्कोनी शरीरांत नायट्रोजन युक्त द्रव्ये असतात, पण वाटोळे कण नायट्रोजनयुक्त नसून फॉस्फेट अथवा मॅग्रेशियमचे निरिद्रिय पदार्थ मिश्र असतात. बीजांमध्ये साविक पदार्थाबरोबरच नायट्रोजनयुक्त शरीरें ( Proteids) थोडीबहुत असतात. त्यांस कधी विशिष्ट आकार येतो, अथवा साधारणपणे वाटोळ्या स्थितीत नेहमी आढळतात. सात्त्विक व नायट्रोजनयुक्त शरीराबरोबरच पुष्कळ बीजांमध्ये तेल आढळतें. गळिताची बीजे म्हणून जी प्रसिद्ध असतात, त्यांत नेहमी तेलाचा साठा असतो. जसे, करडई, शिरस, भुयमूग, तीळ, वगैरे. - तेलाचा सांठा केवळ बीजांमध्येच असतो असें नाही. पानांमध्ये अथवा फुलांतील पांकळ्यांमध्येसुद्धा तेलाचा अंश असतो. लिंबू अथवा युकॅलिप्टसूची पाने बोटांनी चुरडली असतां एक प्रकारचा विशिष्ट वास त्यांपासून येतो. हा वास पानांतील उडणाऱ्या तेलाचा होय. गुलहौसी लोक सुवासिक अत्तरें व तेलें जी वापरितात, त्यांचा उगम पानांतील अगर फुलांतील तैलोत्पादक पिंडजालापासून होतो. तज्ञ लोक भट्टया चढवून सुवासिक पानांचा व फुलांचा व्यावहारिक फायदा करून घेतात, पेशीरसामध्ये इन्युलिन् ( Innulin ) नांवाचा सेंद्रिय पदार्थ विरघळून त्याशी एकजीव झाला असतो. डॅहलिया वनस्पतीचे मूळ काही दिवस अलकोहलमध्ये ठेवून पुढे सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये त्याचा पातळ भाग पाहिला असतां इन्युलिनचा साखा पेशीरसापासून अलग होऊन त्याच्या स्फटिकाकृति दिसतात, निरिंद्रिय द्रव्येसुद्धा पुष्कळ वेळां पानांमध्ये एकत्र होऊन त्यांस निरनिराळ्या आरुति येतात. ह्या द्रव्यांचा वनस्पतींशरीरपोषणास फारसा उपयोग नसतो. पाने व साली गळून पडल्या असतां त्यांबरोबर हे पदार्थ आपोआप गळून