पान:वनस्पतीविचार.djvu/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतिविचार. [प्रकरण शोपित अनेंद्रिय ( Inorganic ) द्रव्यांपैकी पुष्कळवेळां काही द्रव्ये पेशीस निरुपयोगी असतात. त्यापासून सेंद्रिय पदार्थ वनस्पति बनवीत नाहीत, अथवा अन्नद्रव्याप्रमाणे त्यांचा उपयोग करीत नाहीत. असली द्रव्ये खरोखर पेशीबाहेर टाकिली पाहिजेत. पण वनस्पतींत अशी निराळी योजना नसते की, ज्यायोगाने असल्या त्याज्य वस्तु सहज बाहेर टाकितां येतील. ह्मणून असल्या निरुपयोगी वस्तू पेशी भित्तिकेमध्ये सांठविल्या जाऊन वेळ आली ह्यणजे भित्तिका झडून जाते व त्याबरोबर त्या बाहेर टाकिल्या जातात. तृणजातीच्या वनस्पतीमध्ये पानांत नेहमी चमकणाऱ्या वाळूचे कणसूक्ष्म आढळतात. रबर, पिंपळ, वड वगैरे वनस्पतीत पानाच्या उपरी (बाय) त्वचेत (Epidermis) असली निरिंद्रिय द्रव्ये आढळतात. बिगोनियाची पानें, कांद्याच्या पाती वगैरेमध्ये ही निरिंद्रिय द्रव्ये निरनिराळ्या मारुतीत आढळतात. एकंदरीत पेशीभित्तिका केवळ साध्या सा. त्विक घटक द्रव्याची नसून त्यांत वरील प्रकारची निरिंद्रिय द्रव्ये सांपडतात. केंद्रः-(Nucleus) केंद्राचा आकार सजीवत्वापेक्षा स्पष्ट असून केंद्रद्रव्ये जीवनकणासारखी असतात. केंद्रामध्ये केंद्रबिंदू ( Nucleolus ) असतो. केंद्रद्रव्यांत फॉस्फसरयुक्त कांहीं कण आढळतात. त्या कणास पेशीचे मेंदुस्थान समजण्यांत येतें. जव्हां पेशीमध्ये पाणी अधिक झाल्यावर जडस्थाने तयार होऊ लागतात, त्यावेळेस केंद्र आपले मूळचे स्थान सोडून बाजूस जाते. जीवनकण परिघाकडील बाजूस चिकटून राहतात. केंद्राचा व जीवनकणांचा संबंध बारिक तंतमधन असतो. हे तंतू जीवनकणांचे बनले असून जडस्थानात (Vacuole) टेका देण्यास उपयोगी पडतात. सजीवतत्त्वांचे कण भित्तिका तयार करण्यांत अथवा ती मोठी वाढविण्यांत खर्चिले जाऊन त्याबरोबर शेषित द्रव्यापासून नवीन सजीव कण उत्पन्न होत असतात. पेशी पूर्ण वाढल्यावर आंतील सजीव तत्व कमी होते व शेवटी ती मृतप्राय होते, मृत होण्यापूर्वी नवीन पेशी उत्पन्न होऊन त्यामध्ये पूर्ववत चैतन्यशक्ति येते. जुन्या पेशीचे काम फार दिवस सजीव प्रकारचे नसते. कायम स्वरूप प्राप्त झाल्यावर पेशीच्या आस्तित्त्वामुळे दुसऱ्या पेशीस आधार व संयोगशाक्त ह्याशिवाय दुसरें कार्य त्याकडून होत नाही. अथवा रसाची नेआण करणे वगैरे कामाकरितां कांही दिवस उपयोगी पडतात. पण पुढे ह्या कामा.