Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ वनस्पतिविचार, [प्रकरण man कोठडीस जशी चिकटलेली असते व अशा अनेक कोठड्या मिळून एक पो. झालेले असते, तद्वतच अनेक पेशींची मिळून एक वनस्पनि बनलेली असते. अथवा नारिंगें सोलून आंतील मधूर बलक उघडा केला असतां लहान लहान रसमय गठडया एकमेकांस चिकटलेल्या आढळतात. पैकी एका गठडीची जी आपली कल्पना असते, तीच पेशीसंबंधानें लागू पडते. सजीव तत्त्व (Protoplasm):-पेशीचा मुख्य मालक आंतील सजीव तत्त्व ( Protoplasm ) असून ह्या तत्त्वामुळे पेशीत चलनवलनादि खेळ दृष्टीस पडतात. नवीन अन्न शोषण करणे, बाहेरील निरिद्रिय द्रव्ये पोटांत घेणे व त्यापासून सेंद्रिय पदार्थ बनविणे, श्वासोछ्वास करणे, वगैरे क्रिया सजीव तत्त्वामुळे घडतात. सजीवतत्त्वाची घटक द्रव्ये, कारबन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, गंधक व फास्फरस ही आहेत. ती द्रव्ये कोणत्या बरोबर प्रमाणांत परस्पराशी संयोग पावली आहेत, हे निश्चित ठरवितां येणार नाही. कारण पृथक्करणाचे वेळी सजीव तत्त्व मृत होते, व मृत स्थितीमधील पृथक्करण खरे नाही. चैतन्यस्थिति गेल्यावर कदाचित त्यामध्ये पुष्कळ रासायनिक फरक होत असतील अथवा चैतन्याचे अभावी त्यांतील एखादे तत्त्व नाहीसे होऊन ते पथकरण खरे समजतां येणार नाही. वरील घटकावयवें सजीव तत्त्वाची न समजतां मृत जड तत्त्वाची आहेत असे समजावें. पेशीभित्तिकाः--(Cell wall) मधासारखे जाड, पातळ ना घट्ट असें मध्यम प्रकारचे द्रवात्मक चैतन्यशक्ति सजीवत्त्व पेशीमित्तिकेंत असतें. पेशीभित्ति. केचे घटक सत्त्वासारखे असतात. सहा भाग कारबन्, दहा भाग हैड्रोजन व पांच भाग ऑक्सिजन, अशा प्रमाणांत घटक पेशीभित्तिकेंत आढळतात.कापसाचे केसांत जी घटक द्रव्ये आढळतात, तीच द्रव्ये पेशी भित्तिकेमध्ये असतात. पेशी भित्तिका सजीव तत्त्वापासून पातळ पडद्यासारखी बाहेरील बाजूस बनत जाते. सजीव तत्त्वाच्या चैतन्य शक्तीमुळे नवीन नवीन कण बाह्य पडद्याच्या सूक्ष्म रंध्रांत जाऊन बसतात. जसे जसें जास्त कण पडद्यामध्ये जमतील तसतशी पडदा अगर भित्तिका जाड होते. पेशीभित्तिकेंत पाणी कमी अधिक असते. त्यासंबंधी निरनिराळी मते आहेत, प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रवेत्ता नगिली ह्याचे असें म्हणणे आहे की, पेशीघटक द्रव्ये साखरेच्या कणाप्रमाणे चौकोनी, वाटोळी, त्रिकोणी, वगैरे आकाराची