पान:वनस्पतीविचार.djvu/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ वें]. qof Leaf. आकार प्राप्त होतात. सांगाडे साधे तर पाने साधी, सांगाडे संयुक्त तर पार्ने संयुक्त, हे तत्व नेहमी लक्षात ठेवावें. आंबा, फणस, तुळस, उस वगैरेमध्ये पाने साधी (Simple) असून गुलाब, वाटाणा, शेवरी, बेल, उडीद, मूग वगैरेमध्ये पाने संयुक्त ( Compound ) असतात. कित्येक वेळां संयुक्त पानांमध्ये पत्राच्या जोड्या असल्यामुळे त्यास जोडीदार पाने ( Pinnate) म्हणतात. जसें बाभूळ, बाहवा, निंब, वगैरे. शेवर किंवा टॅपिओकामध्ये पाने संयुक्त असून जोडीदार असत नाहीत. त्यांची पत्रे वाटोळी चिकटल्यामुळे त्यास हस्तसादृश्य आकार येतो. साध्या पानांत सुद्धा पुष्कळ मुख्य शिरा देठापासून वाढून त्यांचा सांगाडा हातासारखा बनतो. एरंडी, कापूस, अंबाडी वगैरेमध्ये पाने साधी असून पानांस एकाकी जोडीदार आकार येतो. असो. पानांच्या विचारांत आकार, अग्रे, बाजू अगर कडा व पृष्ठभाग वगैरे गोष्टींचे वर्णन येणे भाग आहे. पाने साधी अगर संयुक्त, जोडीदार अथवा हस्तसादृश्य वगैरे बाबींचा विचार झाला पाहिजे. पानांच्या शिराविषयीं भेद, समांतर किंवा जाळीदार, ह्यांपैकी कोणत्या प्रकारची पाने एकदल तसेंच द्विदल धान्यवनस्पतींमध्ये आढळतात, पानांची खोडावरील मांडणी, त्यापासून होणारे फायदे, पानांची अन्य स्वरूपें, पानांची आवरणे, वगैरे प्रत्येक गोष्टीचा निर्देश झाला पाहिजे. इतक्या बाह्य गोष्टींचा विचार झाल्यावर नंतर पानांची अंतररचना, त्यांपासून रोज घडणारी काय, पानांची जीवनचरित्रांतील महती वगैरेकडे आपले लक्ष्य द्यावे लागेल. आतां आपणही क्रमाक्रमाने एका एका गोष्टींचा या ठिकाणी विचार करूं. आकार-- साध्या पानांचे आकार पुष्कळ प्रकारचे आढळतात. आळवाचा देंठ अगर नॅस्टरसियमचा देंठ, पत्राच्या मध्यभागी चिकटल्यामुळे त्यास ढालीसारखा आकार येतो. कित्येक वेळां मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंस पत्राची वाढ सारखी होत नाही. जसे बकाणा लिंब. दर्भामध्ये पत्राच्या बुडाची तसेंच अग्राजवळील रुंदी सारखी असते. बांबू , वेत, केवडा, कण्हेर वगैरे मध्ये पाने मध्यभागी रुंद असून दोन्ही टोकास निमूळती असतात. त्यामुळे त्यास भाल्यासारखा आकार येतो. वडाचे पान लांबट असून बुडाशी तसेंच शेंड्याशी सारख्या