पान:वनस्पतीविचार.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतिविचार. [प्रकरण व येथे एवढे सांगणे भाग आहे की, सूत्रकोष्ठ केवळ ह्याच प्रकारचे असतात असें नाही. ते पानांसारखे अथवा पत्रांसारखे असतात. जसें, वाटाणे वगैरे. तसेंच ते पानांची उपांगें बनतात. जसें, स्मायलॅक्स. म्हणून धाग्याचे उगमस्थान लक्ष्यात घेऊन ते सूत्रकोष्ठ, अथवा पर्णकोष्ट किंवा त्यांचे उपांग आहे हे ठरवावें. सर्व ठिकाणी त्यांचा उपयोग सारखाच होतो. सूत्रे येणा-या वनस्पती बहुतकरून निर्बल वेल असतात. त्यात दुसऱ्याचा आश्रय घेऊन वर चढावयाचे असते व ही सूत्रे त्या कामी उपयोगी पडावीत अशी नैसर्गिक तजवीज असते. पाणवनस्पतीः-पाण्यांत वाढणाऱ्या वनस्पतींचे खोड टणक अगर कठीण नसते. बुंध्यांत काष्ठ (Wood ) अथवा काष्ठतंतू (Wood fibres) फारसे वाढत नाहीत. बुंध्यामध्ये वायूयुक्त नळ्या ( Air canals) पुष्कळ असल्या कारणाने वनस्पताचे शरीर हलके व पाण्यावर तरण्याजोगें होतें. कमकाचा बुंधा चिखलात रुतून तेथेंच त्याच्या मुळ्या सुटतात. बुंध्यापासून लांब • दांडी निघून पाने पाण्याचे वरचे भागावर पसरतात. व्हलिसिनेरिया वनस्पतींत बुंधा चिखलात वाढून पाने पाण्यामधून उभी सरळ वाढतात. कित्येक वनस्पतींत सोड पाण्याचे पृष्ठभागांवर तरंगत राहते, व पाणी वाहते असले तर त्याबरोबर ते वाहत राहते. जसें, शैवाल तंतू ( Spirogy ra). सा शिंगाडा, पाणवनस्पती आहे. ह्याची लागवड उत्तर हिंदुस्थानांत पुष्कळ ठिकाणी पाणथळ जागेत, अगर तलावांत करितात मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणच्या पुष्कळ लोकांनी ह्याचे खोड चिखलांत कसे रुजतें, जागजागी मुळ्या कशा मुटतात, फुले कशी येतात, वगैरे पाहिलेच असेल. जमिनीवर पसरत जाणारी व पाण्यांत सरळ वाढणारी खोडे, ही दोन्हीं सारखी आहेत,असें म्हटल्यास हरकत नाही. जमिनीवर पसरलेल्या फांदीवर जागजागी कांड्यांतून मुळे मुटतात व वरील बाजूस पाने येतात. त्याचप्रमाणे पाण्यांतील वाढत्या फांदीवर कांड्यांपासून मुळ्या सुटतात, व वरील बाजूस पार्ने यतात. फक्त दोन्हीमधील फरक म्हणजे एकाचे वाढण्याचे स्थान पाणी व दुस-याचे स्थान जमीन. पाणी आटू लागले असतां पाणवनस्पती बुडाकडे चिखलावर पसरत जातात, व पुढे पाणी नाहीसे झाले म्हणजे त्या पाण्यातील वनस्पती व जमिनीवर पसरणाऱ्या वनस्पती ह्या दोहोंत अंतर दिसत नाही.