पान:वनस्पतीविचार.djvu/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ ... वनस्पतिविचार... [प्रकरण www.mmmmmmmwwwwwwwwwwwwww खालचे भागी तंतूमय मुळे असतात. पानांचे जाड बुडांमध्ये कांहीं पोष्टिक अन्न सांठविले असते. जसें लसणीच्या कांड्या, कांद्याच्या पांढऱ्या जाड पात्या इत्यादि पानांचे पोटी कळ्या असतात व त्यापासून निराळी रोपे तयार होतात अशा खोडास 'कंद ' (Bulb) म्हणतात. . येथे एक विशेष गोष्ट लक्षात ठेवावी की, सकंदकोष्ठ (Corm) अगर कंद ( Bulb ) ही केवळ एकदलधान्य वनस्पतिमध्ये आढळतात. द्विदलधान्य वनस्पतिमध्ये असली खोडें विरळा असतात. - कंदकः-(Bulbil) घायपातीचा एक मुख्य सोट वाढून त्यावर फुलें येतात. ती फुलें पक्क होऊन गळून जातात. फुलांच्या देंटावर निराळ्या कळ्या उत्पन्न होऊन त्यांची लहान रोपटी झाडावरच तयार होतात ही रोपटी खाली पडली असता त्यापासून मुळ्या जमीनीत शिरून स्वतंत्र घायपातीची झाडे तयार होतात. शेताच्या कुंपणाभोवती घायपात लावण्याकरितां ही तयार असलेली रोपटी लावावीत. ह्याची झाडे, बीजे पेरून उत्पन्न होण्यास वेळ लागतो. शिवाय बीजे फारसी तयार होत नाही म्हणूनच सृष्टिदेवतेने आयती रोपटी झाडावर तयार केली असतात. ह्या रोपट्यास 'कंदक (Bulbil) हे नांव कंद सादृश्यामुळे दिले आहे. विशेषेकरून ही कंदकें एकदलधान्यवनस्पतिमध्ये असतात. पर्णकोष्ठ-(Phylloclade ) वास्तविक बुंधा अगर फांदी असून त्यांचे स्वरूप बदलल्यामुळे ते दुसरे प्रकार आहेत, असे वाटण्याचा संभव असतो. जसे, निवडुंगाची हिरवी मोठी पाने. ही जाडपाने खरोखर पाने नाहीत तर ती शास्त्रीयदृष्ट्या पानासारख्या फांद्या आहेत त्यावर कोवळ्या स्थितीत वेणारी लहान पानें तसेंच कांटें व लाल तांबडी बो. ह्यावरून खात्री पटते की, ती पानें नसून त्या फांद्या आहेत. केवळ पानांवर अशा प्रकारची फळे वगैरे कधी येत नाहीत. ही गोष्ट खरी की, पानाप्रमाणे ह्या जाड भागांमध्ये हिरवा रंग, पूर्ण वाढतो व त्यामुळेच ती पाने आहेत असे वाटते. सृष्टिदेवतेने त्या जाडभागांत हरिद्वर्ण पदार्थ (Chlorophyll) उत्पन्न करून पानाची सोय केली असते. वास्तविक नेहमी पानांत हरिद्वर्ण पदार्थ असतो. पण येथे पाते लवकर गळून गेल्यामुळे ही तजवीज करणे भाग पडते, जर हरिद्वर्ण पदार्थ त्या भागांत उत्पन्न केला नसता तर हवेतून कार्बन आम्ल शोषून घेण्यास पंचाईत पडली असती. कार्बन आम्लवायू शोषण्यास ह्या हरिद्वर्ण पदार्थाची अवश्य जरूरी