पान:वनस्पतीविचार.djvu/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

5000 वनस्पतिविचार. प्रकरण १ लें. सजीव व निर्जीव वस्तूंची मीमांसा. पृथ्वी काही विशिष्ट वस्तूंची बनली आहे व प्रत्येकं वस्तु तीन स्वरूपांमध्ये असू शकते. ही स्वरूपें वायु, द्रव व घन होत. ही स्वरूपें प्रत्येक वस्तूस कमीआधिक उष्णतेच्या मानाने प्राप्त होतात. नेहमीचे उदाहरण-पाणी हे ध्या. ह्यास ही तिन्ही रूपें कमी आधिक उष्णतेप्रमाणे देतां येतात. पाण्याचे बर्फ, त्याची वाफ, अगर वाफेचे पाणी, अथवा पुनः बर्फ, इत्यादि रूपें पाणी ह्या वस्तूस फारच थोड्या प्रयासाने देतां येतात. आतां पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा विचार केला असता. आपणांस असे आढळून येईल की, काही वस्तु वायुरूपांत, कांहीं द्रवरूपांत व कांहा घनस्थितीत असतात. उदाहरणार्थ, वातावरण, समद्र, डोंगर, वगैरे. - पुष्कळ शास्त्रज्ञांचें असें म्हणणे आहे की, हे सर्व विश्व प्रथम अत्युष्ण वायु-. रूपी होते व ह्या वायुरूपी विश्वास चक्रगति प्राप्त झाली होती. चक्रगतीबरोबरच केंद्रोत्सारिणी ( Centrifugal ) शक्ति उत्पन्न होत असते. शेतकरी गोफणींत दगड घालून दोन तीन वेळां गोफण फिरविल्यावर आंतील दगड फार जोराने फेंकू शकतो. प्रथम शेतकरी गोफणीस चक्रगति देतो. जसजसा चक्रगतीचा जोर आधिक होतो, त्या प्रमाणांत केंद्रात्सारिणी शक्ति अधिक वाढते. ह्या नियमान्वये गोफणींतील दगड वेगानें दूर जातो. तद्वतच ह्या अत्युष्ण चक्रगति प्राप्त झालेल्या वायुरूपी गोलापासून शेंकडों लहान लहान वायुरूपी गोल दूरवर फेंकिले गेले. अशा दूरवर फेंकिलेल्या गोलांपैकी पृथ्वी हा एक गोल आहे.