Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ वनस्पतिविचार, [प्रकरण wwwimmmmmmmmmwwwwwwwwwwwwwwm wwwwwwwwwww कठीण अन्नही सात्विक अन्नापैकीच आहे. डाळीवर्गात व इतर फळांत नायट्रोजनयुक्त पोष्टिक द्रव्ये आढळतात. ही सर्व अन्ने निरनिराळ्या स्थितीत असतात. तथापि बीजाचे जनन होत असतां त्यावर रासायनिक परिणाम होऊन, ती अन्ने विरघळतात. या विरघळलेल्या स्थितीत ती द्रव्ये लवकर पचविली जाऊन संघटनात्मक कार्य घडते. त्यामुळे बीजापासून अंकुर फटन रोपा वाढू लागतो. बीजांतील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांतील गर्भ होय, व त्यामुळेच बीजास इतके महत्त्व आले आहे. कारण त्यापासून पुढील रोपा अगर झाड तयार होते. बीजांतील अन्न व कवची इतकी महत्त्वाची नसून मुख्य गर्भास सर्व प्रकारची सोय व्हावी व त्याच्या मार्गात कोणतीही अडचण पडूं नये, एतदर्थ त्यांची योजना असते. गर्भ हा खरोखर बालरोपा असून त्यांत रोप्याचे सर्व भाग संकुचित स्थितीत आढळतात. बीजदलें (Coty-ledons ), आदिमूल ( Radicle ) व प्रथम खोड ( Plumule ) तसेंच त्या गभीस अवश्य लागणारा पोपक मगज, इतक्या वस्तु गर्भात आढळतात. ह्या वरील वस्तूंखेरीज अशी दुसरी वस्तु कोणती आहे की, ती गर्भात नसतां केवळ झाडांतच आढळते. फुले येण्याच्या प्रथमची जी वनस्पतीची स्थिात असते, ती स्थिति गीची असते. फक्त प्रत्येक वस्तु लहान व संकुचित प्रमाणांत असते, एवढाच काय तो फरक. बीजदलांच्या संख्येप्रमाणे एकदल, द्विदल अगर बहुदल बीजें समजतात. - एकदल बोजांतील गर्भ एका बाजूस असून त्याचे भोंवतीं मगजाचे आवरण असते. कधी कधी द्विदल जातीप्रमाणे मध्यभागी गर्भ असून चोहोबाजूस मगजांचा सांठा असतो. पण अशी स्थिति विरळा असते. द्विदलचीजांत गम नेहमी मध्यभागी असून आदिमूल व प्रथम खोड ह्यांचा सांधा दोन्ही बजिदलास चिकटला असतो.बीज छिद्राच्या जवळच आदिमूल असून त्यांतून ते उगवून बाहेर येते. प्रथम कोंब लहान लहान पानांचा बनला असतो. द्विदल बीज उगवतांना नेहमी मध्यभागी दोन समोरासमोर पाने दृष्टीस पडतात. पण एकदल बीजांत पान एक येऊन तें जणं गंडाळले आहे, असे वाटते. विशर्षकरून बीजदलें सारख्या आकाराची असतात. कधी कधी त्यांचं कमा अधिक लहान आकार आढळतात. जसें शिंघाडा वगैरे. द्विदल वनत्यतीत