पान:वनस्पतीविचार.djvu/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ वें] . बीज. aawar १९५ प्रकरण २३ वें. बीज... आतां आपणांस फळांतील बीजांचा विचार केला पाहिजे. पूर्वी काहींसा थोडा विचार बीजांविषयी केला आहेच, त्यांचा संबंध विशेषेकरून बजिजनन (Germination) दृष्टीने झाला. याठिकाणी गर्मीहत बीजाण्डा (Ovules) पासुन कोणत्या घडामोडी हाऊन बीजस्वरूप प्राप्त होते, तसेंच बीजाण्ड-स्थिती, बीजस्थितीत कसें स्वरूप बदलत गेले, ह्याचा विचार केला जाईल. खरोखर मुख्य बाबतींत बीजाण्ड व बजि यांत फारसा फरक नसतो. अण्डावरील दोन्ही पडदे बीजस्थितीत कायम असतात, अथवा संकुचित होऊन त्याची जाड कवची बनते; जसें अण्डांत पोषक अन्नाचा बलक असतो, त्यात माणे बीजामध्येही अन्नसामुग्री असते. मग ती अन्नसामुग्री गर्भान्तर असो अथवा गर्भबाह्य असो. तसेच त्यावरील छिद्र ( Micropyle ) बीजस्थितीतही असते. ह्या छिद्राचा दोन प्रकारचा उपयोग असतो. ह्या छिद्राचा फायदा घेऊन परागनळी आंत घुसून गर्भकोशांतून (Embryosac ) गर्भाण्डाकडे जाते. बीजस्थितीमध्ये जेव्हां जनन होऊ लागते, त्यावेळेस आदिमूल (Radicle) जागृत होऊन बाहेर पडते, ते ह्याच छिद्रांतून बाहेर येते. नाळेशी संबंध दाखविणारी खूण बीजांमध्येही असते. बीजांत असणारी बजिदलें अथवा बीजांतील गर्भ, तसेंच त्यांतील खाली व वर जाणारे प्रथम कोंब हे मात्र बीजाण्डांत नसतात. तेथील गर्भकोशांत असणारें गर्भाण्ड गर्भीकत झाल्यावर ते वाढत वाढत गर्भ, बजिदले तसेंच विशिष्ट कोंब उत्पन्न होतात. गर्भकोशांतील द्वितीयक केंद्रा ( Secondary nucleus) पासून अन्नोत्पत्ति होत असते. म्हणूनच ज्याप्रकारचे अण्ड त्याच प्रकारची बीजे बनतात. छिद्र, नाळेची खूण, पडदे वगैरेचा जो संबंध उभा, आडवा, अगर जवळचा जसा असतो. ताच संबंध बीजस्थितीत अढळतो. बीजाण्डाचे बाह्य आवरण बीजस्थितीत टणक. व कठीण होऊन बीजाची बाह्य कवची बनते. बीजाचे बाह्य आवरण