पान:वनस्पतीविचार.djvu/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ वें]. , फळ... १९१ फळांचे वर्गीकरण करण्यांत त्यांची स्त्रीकेसरदले संयुक्त अगर सुटी. अधःस्थ कां उच्चस्थ, सुकी अगर मांसल, एकबीजी अगर बहुबीजी, फुटणारी अथवा न फुटणारी, वगैरे गोष्टींचा विचार केला जातो. शिवाय फळे सरी अगर भ्रामक, तसेंच फळे कापिली असता त्यांत स्पष्ट दिसणारे विभाग, बीजाची मांडणी, फळांतील गीर, अण्डाशयापासून अगर नाळेच्या कमी अधिक वाढीपासून उत्पन्न होतो ह्याविषयी विचार, फळांचे बाह्यांग, बीजाची सोडवणूक, वगैरे सर्व गोष्टींचे मनन करून फळांचे वर्गीकरण कसें करितां येईल हे पाहिले पाहिजे. तसेंच व्यावहारिक व शास्त्रीय फळे ह्यांतील भेद, अथवा फळ एकदली अगर एकबीजी असून जेव्हां विशेष मोठे नसते. तेव्हा बीज व फळ ह्यांमधील फरकही सांगितला पाहिजे. नाहीतर फळास बीज अथवा बीजास फळ, असा चुकीचा समज होण्याचा संभव आहे. साधी फळे. संयुक्त फळे, बहुगुणित फळे, वगैरे प्रकार फळांचे करितां येतात. असो, वरील गोष्टींच्या अनुसंधानाने काही फळांचे वर्णन खाली देण्याचा विचार आहे. - तुळशी व माठ ह्या दोन्ही वर्गातील फळे उच्चस्थ असून एकबीजी असतात. दोन्हीमध्ये बारीक बीज असून दोन्हींतील फळांचे बाह्यांग सुकें वाळलेले असते. पण तुळशीवर्गात फळांतील बाह्यांग बीजापासून अलग करितां येत नाही, व माठामध्ये ते वेगळे करितां येते. ही फळे लहान व एकबीजी अस ल्यामळे फळ व बीज ही दोन्ही एकच असावीत असे वाटते. निदान दोन्हींतलि फरक स्पष्ट कळत नाही. फळांवर नेहमी परागवाहिनीचें कांही चिन्ह असते, पण बीजावर तिचा संबंध नसल्याने कोणतीही त्याप्रकारची खण असणे शक्य नाही. ह्या जातीची फळे सुकी असून फुटत नाहीत, व बीजें माकळी होत नाहीत. __ आंबा, लोकॅट, जांभूळ, बकुळ वगैरे फळे उच्चस्थ असून त्यांतील बाह्यांगाचे तिन्ही पडदे स्पष्ट असतात. बाह्यांगाच्या मध्य पडद्याचा गीर बनून खाण्याचे कामी येतो. फळे मांसल असून आंतील बीजें दगडासारखी कठीण होतात. ही फळे फुटून बीजे बाहेर गळत नाहीत. पावटा, भुयमूग, वाटाणा, उडीद, तूर, ताग, वगैरे फळांस शेंगा म्हणतात. ह्रीं फळे एकदली असून आंत नाळेपासून पडदे उत्पन्न होऊन पुष्कळ खण