Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ वें]. बीजाण्ड व गर्भधारणा. १७५ पुनः त्याचे अधिक विभाग होऊन उरलेल्या सर्व गर्भाण्डास गीत करितात. सरूचे झाडांत पुष्कळ गर्भाण्डे एका ठिकाणी गर्भकोशांत. जमून ती परागकणांची वाढ पहात असतात. अशावेळेस परागनळीतून जी जननपेशी येते. तिचे प्रथम विभाग न होता त्या नळीचे टोकास पुष्कळ लहान नळ्या उत्पन्न होतात. नंतर त्या जननपेशीपासून जितक्या जननपशीची जरूरी असेल तितक्या जननपेशी उत्पन्न होऊन त्या लहान लहान नळ्यांतून एक एक पेशी प्रत्येक गर्भाण्डाकडे जाऊन त्यांचा मिलाफ होतो, व गर्भधारणा परिपूर्ण होते. देवद्वार, पाईन, वगैरेमध्ये प्रथमपासूनच परागकणापासून निराळ्या नळ्या उत्पन्न होऊन प्रत्येक गर्भाण्डाजवळ भिडते, व त्यांतूनच जननपेशी बाहेर येऊन त्या गर्भाण्डाशी एकजीव होते. एकजीव झाल्यावर गर्भधारणा परिपूर्ण झाली, असे समजावें. ह्याठिकाणी एक गोष्ट लक्ष्यांत ठोवण्यासारखी आहे की, जरी निरनिराळ्या परागकण नळ्या असतात, तरी गर्भाण्ड व नळी ह्यामध्ये थोडे अंतर राहते. ह्या मध्यभागी पाण्यासारखा पातळ रस असल्याने जननपेशीस पोहून गीण्डाकडे जावे लागते. पोहण्यास सुलभ व्हावे म्हणून पेशीत थोडी वल्ह्यासारखी व्यवस्था असते. खरोखर क्षुद्रवर्गात ह्याच प्रकारची व्यवस्था आढळते. त्यामध्ये पुरुषतत्त्वाचा स्वीतत्त्वांशी मिलाफ होण्यास पुरुषजननपेशीस अशाच प्रकारे पाण्यांतून पोहून जावे लागते. क्षुद्रवर्गासंबंधाने तूर्त आम्ही जास्त विचार करीत नाही, तथापि बहुदलधान्य वनस्पतींत व क्षुद्रवर्गात गर्भाधारणेसंबंधी व्यवस्था काही बाबतीत अगदी सारखी असते, यांत संशय नाही. म्हणूनच बहुदलधान्यवर्ग हा उच्च पुष्पवर्ग व क्षुद्रवर्ग ह्या दोहोंमधील मध्यम वर्ग आहे, अथवा उच्च पुष्पवर्ग व क्षुद्रवर्ग या दोहोंस जोडणारा सांखळीचा मध्य दुवा आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. - गर्भधारणा घडून येण्यांत किती गोष्टी घडतात, व कोणतें फरक होतात, ह्याचा विचार वर झालाच आहे. परागकण कशा रीतीने परागवाहिनींतून आंत घुसतात. पुंतत्व-बिंदूचे कसे विभाग होतात व गर्भकोशांत शिरल्यावर गर्भाण्डांशी त्याचा कसा मिलाफ होतो; वाटेत असणाऱ्या दोन केंद्रांकडून तो पुतत्वबिंदु कसा आकर्षिला जातो व पुढे त्यांमधून गर्भाण्डास कसा