पान:वनस्पतीविचार.djvu/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वें]. बीजाण्ड व गर्भधारणा. १७३ w oons एरंडी, गाजर, वगैरे. एरंडीमध्ये दले पातळ असून गर्भाभोवती अन्नाचा साठा असतो. एकदल वनस्पतींत अन्नांचा सांठा एका बाजूस असून गर्भही एका बाजस असतो. एकदल वनस्पतींत सर्व पोषक अन्नाचा सांठा गर्भ वाढत असतां शोषिला जात नाही. जसे-गहूं, बाजरी कांदा, लसूण इत्यादि. मागें आपण मक्याच्या दाण्याचे परीक्षण केलें आहेच. तो एकदल वर्गापैकी असन त्यांत पोषक अन्नाचा सांठा एका बाजूस असतो. आर्किडमध्ये बीज एकदल वर्गापैकी असून अन्नांचा सांठा गर्भाभोवती न राहतां आंत शोषिला असतो. या बाबतीत तो द्विदल वर्गासारखा असतो. मगजवेष्टित ( Abuminous ) बीजे म्हणून माग सांगण्यांत आले आहे, त्यांचा उगम ह्याच अन्नाच्या साठ्यांपासून असतो. गर्भ पक्क होऊ लागला म्हणजे, अण्डावरील बाह्य आवरणे वाळून तीच बीजावरील फोल अगर गर्भकवची ( Testa) बनते. येणेप्रमाणे गर्भअण्डापासून बीजोत्पत्ति होते. खरोखर बीज म्हणजे पक्क झालेले गर्भीकत गर्भाण्ड होय. ह्यांत गर्भ असल्यामुळे हा बाल रोपा आहे. - येथे एक गोष्ट सांगणे जरूर आहे की, बीजाण्डावरील छिद्र (Micron. yle ) नेहमी परागनळीस आंत शिरण्यास उपयोगी पडतें, असें नाहीं. बीजाण्डांतील दोन्ही पडदे व गर्भकोशा भोवती असलेला पोषक वलक, ह्यांचा एकाच जागी निकट संबंध येऊन त्या जागेतून ( chalaza) गर्भास पोषक द्रव्ये बाहेरून पोचविली जातात. ही जागा नेहमी अण्डाच्या बुडाशी असते. अप्राकडील छियाचा उपयोग जेव्हां परागकण नळीस होत नाही, त्या वेळेस ह्या बुडाकडील बाजूंतून (chalaza ) परागकण नळी आंत शिरते. कॅसझेरिना ( Casuarina) नांवाच्या झाडावर केवळ स्त्रीकेसर अगर केवळ पुंकेसर फुले असून स्त्रीकेसर फुलांतील अण्डाशयांवर परागकण पडतात, तेव्हां परागकणांची नळी नाळेतून वाढत वाढत बीजाण्डाच्या खालील बुडांतून वर शिरत जाते. तेथूनच पुढे सरकत सरकत गर्भकोशांत जाऊन आंतील गर्भाण्डास ( Egg-cell) पूर्वीप्रमाणे गर्भीकत करिते. नळीतून येणान्या पुंतत्त्व पेशीचे दोन विभाग होऊन एक भाग गर्भाण्डाशी एकजीव होतो. एकजीव होणे म्हणजे गर्भधारणा होणे. अशाच प्रकारची उदाहरणे पुष्कळ आढळतात. पूर्वी पुष्कळ दिवस असा समज असें कीं पराग-नळी केवळ छिद्रांतूनच बीजाण्डांत शिरते व त्यास दुसरा मार्ग बिलकूल