पान:वनस्पतीविचार.djvu/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वनस्पतिविचार, [प्रकरण Amarpornwrnar ओंव्याचे फुलांत स्त्रीकेसरदले दोन असून पुढे अण्डाशयांत चार खण उत्पन्न होतात. प्रत्येक दलांत मध्यभागी पडदा येऊन, प्रत्येकाचे दोन विभाग होतात. आता ही गोष्ट खरी की, गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ वाढत असतांना पुष्कळ फरक होत असतात, व त्या घडामोडींत दलांत कमी-अधिक खण अगर कप्पे तयार होतात. कित्येकवेळां प्रथम जरी ज्यास्त दलें असली, तरी फळामध्ये तितकीच दले आढळतील असे नाही. जसे-गहूं, झेंडू, वगैरे. म्हणूनच प्रथम अण्डाशयांत ज्या गोष्टी आढळतात, त्या पुढे कायम राहतात असे नाही. । अण्डाशय बहुतकरून पुष्पाधारांवर असतो. त्याचा संयोग पुष्पकोशाशी झाला असता त्यास अधःस्थ म्हणतात. तसेच तो मोकळा व सुटा असला तर त्यास उच्चस्थ म्हणतात, हे मागे सांगितलेच आहे. पाकळ्या अगर पुंकेसरदले ह्यांस पानासारखें कधी कधीं देंठ असतात. विशेष करून अण्डाशयास कधी त्या प्रकारचे देंठ आढळत नाहीत, पण ह्या गोष्टीसही अपवाद आहेत. जसें-तिळवण वगैरे. पुष्पाधाराचीच अधिक वाढ होऊन अण्डाशयास देंठ उत्पन्न होतो. सुट्या स्त्रीकेसरदलांची संख्या सहज मोजितां येते, पण संयुक्त अण्डाशयांत दलें किती आहेत, हे सहज कळत नाही. शिवाय फळ पूर्ण वाढले असतां निरनिराळे खण उत्पन्न झाल्यामुळे केवळ खणांवरून त्यांची संख्या टरविणे योग्य होणार नाही. परागवाहिन्या अगर त्यांची अने यांवरून दलांची संख्या समजणे सुलभ असते. कारण ती म्हणजे दलांची वाढती टोकें होत. म्हणून जितकी त्यांची संख्या असते, तितकी दले असतात. जेव्हां परागवाहिनी संयुक्त असते त्यावेळेस त्यांची अग्रे मोजून दलांची संख्या मोजितां येते, अण्डाशयांत ज्या भागास बीजाण्डे चिकटली असतात, त्या भागास नाळ असे म्हणतात. एकदली तसेंच बहुदली अण्डाशयांत नाळेची मांडणी वेगवेगळ्या प्रकारची असते. एकदली अण्डाशयांत नाळ बाजूकडे असते. त्यासच बाजें चिकटली असतात. पावट्याची शेंग सोलून पोटाकडील भागाकडे असणारी नाळ तसेंच त्यापासून उत्पन्न झालेली बजि पहावीत, येथे स्त्रीकेसर दलाचे दोन्ही किनारे एकजागी चिकटून त्यापासून दोरीप्रमाणे जाड भाग बनतो, व त्या जाड भागास नाळ अशी संज्ञा असते. गर्भ वाढत असतांना गर्भास लागणारा प्राष्टिक अन्नाचा ओघ नाळेतनच जात असतो. किना-याकडे असणारी नाळ