Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ वनस्पतिविचार, [प्रकरण rammmmmmmmmmmmmmmmmmmm स्थाही साधी असते. तसेच ज्या प्राण्यांची शरीररचना संकीर्ण असते त्यामध्ये ज्ञानव्यवस्थासुद्धा संकीर्ण आढळते. प्राण्यास कोणतेही सूक्ष्म उत्तेजन जरी मिळाले तरी ज्ञानतंतूंकडून त्यांस ते सहज समजतें, व ते सहन करण्याची त्याची शक्ति असते; व त्यास जबाब देणे अथवा उत्तरादाखल निरनिराळ्या प्रतिक्रिया करणे, किंवा हावभाव करणे, वगैरे गोष्टी ज्ञानतंतुमुळेच घडत असतात. ह्यांवर अम्मल करणारी शक्ति सजीवतत्वामध्ये असते, व तत्संबंधी व्यवस्था तेच करीत असते. उच्च प्राण्यांत डोके हे मज्जातंतूचें केंद्रस्थान आहे, त्यापासून खाली सर्व शरीरभर मज्जातंतु खेळले असतात. सर्व तंतूंचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे कोठेही शरीरावर काही झाले तरी त्याचे ज्ञान ताबडतोब शरीरांस माहित होते. आतां वनस्पतिवर्गात इतकी उच्च ज्ञानव्यवस्था असणे शक्य नाही. तथापि न्यामध्ये क्षुद्र प्राण्याप्रमाणे थोडी बहुत असते एवढे खरं. त्यांत संकीर्णता असू शकणार नाही. उत्तेजनास प्रत्युत्तर वेळचे वेळेस जीवनकणांकडून मिळत असते. वनस्पतीच्या वयमानाप्रमाणे जीवनकणांची उत्तेजित होण्याची अथवा प्रत्युत्तर देण्याची शक्ति कमी अधिक असते. उत्तेजनास काही तरी वेडेवाकडे प्रत्युत्तर मिळतें असें नाही, तर प्रत्युत्तराने काही विशिष्ट उद्देश साधिला जातो. तसेंच थोड्याशा उत्तेजनामुळे त्याचा परिणाम फार मोठा होऊन बराच वेळ तो राहतो; ही गोष्ट मुद्धां विसरता कामा नये, म्हणून जोराचे उत्तेजन म्हणजे जोराची प्रतिक्रिया अथवा साधे उत्तेजन म्हणजे साधी प्रतिक्रिया, असे प्रमाण ठरवितां येत नाही. रुष्णकमळाच्या सूत्रांस सूक्ष्म जरी स्पर्श झाला, तथापि त्यापासून पुष्कळ वेळपर्यंत त्यास गति मिळते. डासेरा अगर डायोनिया नांवाच्या मांसाहारी वनस्पतीमध्ये पानास सूक्ष्म जरी स्पर्श झाला तरी त्याचें ज्ञान त्यास ताबडतोब होऊन आपल्या भक्ष्यास पकडून ठेवण्याची ती पाने व्यवस्था करितात. तसेंच खरें भक्ष्य आहे किंवा कसे, ह्याचेही ज्ञान त्यांस होत असते. फॅलरिज् Phalaris नांवाची रोपडी सूक्ष्म प्रकाशाकडे सुद्धां वळतात. असल्या सूक्ष्म प्रकाशाचे ज्ञान प्राणीवर्गातील श्रेष्ठ मनुष्याच्या डोळ्यांतही असणे शक्य नसते. पण त्यास दुरूनच त्याची छाया भोळखता येते, म्हणजे प्राणीवर्गात असणारी ज्ञानतंतुव्यवस्था येथेही असते, असें कबूल करणे या वरील गोष्टीमुळे भाग आहे.