पान:वनस्पतीविचार.djvu/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ वें]. उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा. wwwwwwwwwwwwwwwwww wwwmmmmmmmmmmmmmmmmmmm फारच लहान असतात. अशा वेळी कंटकपर्णे (Spines) येऊ लागतात की, ज्याचे योगानें बाष्पीभवन कमी होऊन जीवनकार्य चालू राहते. - हवेचे निरनिराळे फरक व जमीनिची मगदूर ह्यांचा परिणाम वनस्पतिवर्धनांवर होत असतो. अतिथंडी किंवा उष्णता असली तर त्यापासून संरक्षण करणारी अंगें वनस्पतीस प्राप्त होतात. त्यांची रचना त्या परिस्थितीस योग्य अशी बनते. जमिनीत अन्नसामुग्नी असेल तर वनस्पति चांगली पोसते. तसेच वनस्पतीस जेव्हां कीटकादि शत्रूपासून पुष्कळ त्रास होतो, तेव्हां त्यांचे निवारण करण्याकरिता वेळोवेळी त्यास निरनिराळी व्यवस्था करावी लागते. कधी कधी विषारी केंस शरीरांवर येतात. कीटक त्रास देऊ लागले तर, ते केंस किड्यास बोचतात. बोचल्यावर केसांतून विषारी रस किड्याचे शरीरांत शिरतो. त्यामुळे त्यास वेदना होऊन त्यापासून पुनः त्रास होण्याची भीति नसते. अशाच प्रकारें कांटे उपयोगी पडतात. अतिथंडीपासून संरक्षण व्हावें म्हणून पानावर मखमली सारखें केस येतात. एकंदरीत वनस्पती आपल्या परिस्थिति प्रमाणे आपली व्यवस्था करिते. परिस्थिति प्रतिकूल असली तर, तीस अनुकूल करण्याची तजवीज करून जीवनक्रम आक्रमू लागते. प्रसंगा. प्रमाणे ' पाठ देऊन वेळ काढणे' हे तत्त्व वनस्पति-आयुष्य-चरित्रांतही दिसते. एकच वनस्पति निरनिराळ्या परिस्थितीत राहिली तर परिस्थितीप्रमाणे तिजमध्ये स्थित्यंतर होत असते. प्रकरण १६ वें. उत्तेजन व ज्ञानतंतुमीमांसा. परिस्थितीच्या फरकामुळे जीवनकणांत फरक होऊन वनस्पतीच्या बाह्य रूपांत, रचनेंत, तसेंच जीवनक्रमांत बदल दिखू लागतो. पुष्कळवेळां अन्नरस तयार होत असतांना काही अंतबिघाड झाला असतां त्याचा परिणाम तत्काल सजीव-तत्त्वावर होतो. त्याचप्रमाणे वनस्पतीस इजा झाली असा ती भरून काढण्याकरितां पुष्कळ शक्ति खर्च होते, व त्यामुळे जीवनचरित्रांत