पान:वनस्पतीविचार.djvu/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ Fool वनस्पतिविचार, [प्रकरण narrrrrrrrwwwwwwwwwwwwwwwwwwwww सूर्यप्रकाशामध्ये त्वचार चांगली उघडी असून वाफ हवेत मिसळण्यास कोणतीही हरकत येत नाही. अशा प्रकाराने जर पाणी बाहेर गेले नाही तर पाने पूर्ण भरून जाऊन खालून वर येणा-या पाण्यास बिलकूल जागा राहणार नाही. याकरितां हा बाष्पीरूप उच्छ्वास जरूर आहे. खरोखर मूलजनित शक्ति ( Rcot pressure ) व बाष्पीभवन (Trauspiration ) या दोहोंचें अंतिम साध्य बहुतेक एकच असते. मुळांतून द्रवात्मक पदार्थ पानापर्यंत पोहोचविणे, हे दोन्हींचें साध्य एकच असते. दोन्ही आपआपल्यापरी हे साध्य घडवून आणण्याची खटपट करीत असतात. कदाचित् ह्या दोन्ही क्रियेची काय जरूरी आहे, असे वाटण्याचा संभव आहे. जर दोन्हींचे एकच साध्य आहे, तर एकाकडून ते पूर्ण होण्यास काय अडचण असते, दुसरी क्रिया विनाकारण असून तीमध्ये वनस्पतीच्या शक्तीचा -हासवृथा होत असतो, हा समज चुकीचा आहे. दोन्ही क्रियेची सांगड असल्याखेरीज रस वर चढण्याचे काम सुरळीत चालावयाचें नाहीं. कोरडी हवा, जमिनीत भरपूर पाणी व बाष्पीभवनाची साधनें, इतक्या गोष्टींची जोड मिळाली म्हणजे बाष्पीभवन सुरू होते. अशावेळेस मुळांतील शक्तीची फारशी जरूरी नसते. पण हवा दमट असून, बाष्पीभवनाची साधनें जी पाने, जेव्हां गळून जातात, अथवा पूर्ण आली नसतात, अशावेळेस पाणी वर चढण्यास मुळांतील शक्ति उपयोगी पडते. बाष्पीभवन दमट हवेत चालू राहत नाही, म्हणून पाणी वर चढणे बंद होता कामा नये. ह्याकरितां दोन्ही क्रियेची योग्य जोड असली म्हणजे मुख्य कार्यास बाध येत नाही. ज्यावेळेस बाष्पीभवन सुरू असते, त्यावेळेस मुळांतील शक्ति चांगली दृष्टीस पडत नाही, उलटपक्षी मुळांतील शक्ति अंमल करीत असतांना बाष्पीभवन शिथिल व मंद असते. । बाष्पीभवन पानाच्या कमी अधिक वाढीवर अवलंबून असते. रुंद व मांसल पानांतून बाष्पीभवन जास्त जोराने होत असते. तसेंच अरुंद व अपूर्ण वाढलेल्या पानांतून बाष्पीभवन कमी होते. ज्या वनस्पतसि बाष्पीभवनाची जास्त जरूरी असते, त्या वनस्पतींची पाने रुंद व मोठी होतात. तसे पानांतील स्पंजासारखा जाळीदार पेशीसमुच्चय अधीक वाढून पेशीमध्ये पोकळ्या साध्या पानापेक्षा अशा पानांत अधिक आढळतात. सूर्यप्रकाश व उष्णता ही दोन्हीं