Jump to content

पान:वनस्पतीविचार.djvu/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८९ १. वें]. कर्तव्ये. भागत नाही, तर त्यास योग्य परिस्थितीचीही जरूरी असते, अवयवे चांगली कामें करीत आहेत, पण जमिनीत अन्नाचा अंश मुळीच नाही, किंवा अन्न असून अवश्य लागणारे पाणी नाही, अथवा अन्न असून न मिळण्यासारख्या स्थितीत ते असले, तर अशा स्थितीत अवयवें असून सुद्धां पोषणक्रिया कशी चालेल? व अवयवाच्या खटपटीचाही काय उपयोग होणार आहे ! म्हणून खटपट व परिस्थिति यांची योग्य सांगड जुळून आली म्हणजे सर्व गोष्टी फलप्रद होतात. तीन निरनिराळी अवयवें वेगवेगळ्या रीतीने कामें करीत असून शेवटी पोषण हे साध्य घडून येते. तीन निरनिराळ्या कामांचा परिणाम पोषणक्रिया साधण्यांत होतो. निरिंद्रिय द्रव्ये शोषून घेणे, त्यावर रासायनिक क्रिया घडविणे, कार्बन आम्लवायु हवेतून शोषून त्याचे विघटीकरण करणे, तसेंच शोषित निरिद्रिय द्रव्यांशी मिसळून त्यास सेंद्रियत्व आणणे, वगैरे किया ही अवयवें स्वतंत्र रीतीने करीत असतात व त्या सर्वांचा परिणाम व उद्वेश शरीरसंवर्धन व पोषण ह्यांकडे होतो. वरील सर्व क्रिया लक्ष्यांत घेतल्या असतां शरीरपोषण हे किती घडामोडीचे काम आहे, हे सहज कळेल. प्राणी आपले भक्ष्य अवयवांच्या साधनांनी जमवून पोटांत घेतो. पोटांत त्या कच्च्या अन्नावर निरनिराळ्या आम्लांचा रासायनिक परिणाम होऊन त्या अन्नास शुद्ध स्वरूप प्राप्त होतें. ह्यावरही पुष्कळ निरनिराळ्या क्रिया घडून त्याचे शेवटी शुद्ध रक्त बनते. हे रक्त पोषक व निरोगी असून सर्व शरीरभर खेळिले गेल्यावर त्यापासून शरीर-पोषण व संवर्धनकार्य आपोआप घडत जाते. म्हणजे जशा निरनिराळ्या प्रकारच्या क्रिया प्राण्यांच्या शरीरांत अन्नावर होऊन प्राण्यांचे शरीरपोषण होतें, तद्वतचू काही प्रकारच्या क्रिया वनस्पतिअन्नावर होऊन वनस्पतिपोषण होत असते. प्राणी व वनस्पतिवर्ग दोन्ही भिन्न असल्यामुळे त्यांच्या निरनिराळ्या रीतीत फरक असेल, पण मळ साध्यांत फरक नसतो. शरीरसंवर्धन झाल्यावर क्रमाने प्रजोत्पत्ति साधण्याकडे वनस्पतीचें लक्ष्य जाते. ते कार्य घडवून आणणारी साधनें व अवयवे ह्यांचा हळूहळू प्रादुर्भाव होतो. फुले ही उत्पत्तीसंबंधाची अवयवे आहेत. क्षुद्र वनस्पतींमध्ये ही जननोंद्रिये असत नाहीत. त्यांमध्ये उत्पत्तीसंबंधी निराळी तजवीज असते. उच्चवर्गामध्ये पुरुषतत्त्व व स्त्रीतत्त्व यांचा मिलाफ होऊन त्यापासून बीजोत्पत्ति होते, व बीजें म्हणजे पुढील प्रजा होत. गर्भधारणा उच्चवर्गात ज्याप्रमाणे पूर्णत्वास आली