पान:वनस्पतीविचार.djvu/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथकर्त्याचे चार शब्द. - मराठी भाषेत शास्त्रीय विषयावर जे ग्रंथ आजपर्यंत झाले आहेत, त्यांची संख्या अत्यल्प आहे हे कोणासही नाकबूल करता येणे शक्य नाही. व जे काही लहिले गेले आहेत, ते अशा विषयावरील विदेशीय ग्रंथांच्या मानाने अगदी नाहीतच असे म्हटले असतां चालेल. शास्त्रीय विषयाची केवळ शास्त्र या दृष्टीने व्यावहारिक उपयुक्ततेचा विचार बाजूस ठेवून चर्चा करणारी पुस्तकें लिहिण्याचा प्रघात आमच्या देशांत विशेष नव्हता. कोणताही ग्रंथ काही व्यावहारीक उपयुक्ततेच्या दृष्टीनेच लिहिला जात असे आणि म्हणूनच यंत्रशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, निरिदिय व सेद्रिय पदार्थाचें रसायनशास्त्र व वनस्पति शास्त्र या विषयांवर लिहिलेले स्वतंत्र ग्रंथ विशेष उपलब्ध नाहीत. वरील विषयांची माहिती आमच्या पूर्वजांस मुळीच नव्हती, असें मात्र यावरून कोणीही समजू नये. पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र वगैरे विषयांतील मुख्य मुख्य सिद्धान्त त्यांना खास माहीत होते, याविषयी विश्वसनीय आधार सांपडतात. परंतु वरीलसारख्या विषयांची संकलित माहिती निरनिराळ्या स्वतंत्र ग्रंथांतून दिलेली अशी सांपडत नाही. ही उणीव आधुनिक ग्रंथकरांनी अंशतः भरून काढली आहे. वर नमूद केलेल्या विषयावर लिहिलेली छोटेखानी पुस्तकें आज थोडीबहुत उपलब्ध आहेत व याच त-हेचा एक प्रयत्न वनस्पति शास्त्रासंबंधाने मी केला आहे. वनस्पतींच्या गुणधर्माविषयी वैद्यकांत उपयोगी पडणारी माहिती आमच्या वैद्यकावरील ग्रंथांत सांपडते. परंतु या ग्रंथांतून वनस्पतींच्या मूळांपासून तो शेंड्यापर्यंत असणाऱ्या निरनिराळ्या भागांचे वर्णन, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या निरनिराळ्या जाती, त्यांचे रंगरूपभेद, व सजीव कोटीतील एक व्यक्ति, या नात्याने तिच्या पोषणाच्या, वाढीच्या व वंशविस्ताराच्या दृष्टीनें-या निरनिराळ्या भागांची कर्तव्ये व तसेंच या निरनिराळ्या भागांच्या अंतररचनेत असणारे वैचित्र्य वगैरे विषयांची केवळ शास्त्र या दृष्टीने केलेली चर्चा आपणास आढळत नाही. वरील प्रकारची थोडीबहुत माहिती देणारी पुस्तके माझ्यापूर्वी डॉक्टर ( सध्या सर ) भालचंद्र रुष्ण भाटवडेकर, राव ब०