पान:वनस्पतीविचार.djvu/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

www वनस्पतिविचार. [ प्रकरण wwwwwwwwwwwmommmmmmmmmmmmmmwww म्हणजे जुनें मूळ व खोड ह्यांतील ग्रंथीसंबंधी रचना अथवा काष्ठवाढीची दिशा ह्यामध्ये फरक कांहीं राहत नाही. प्राथमिक कोवळ्या स्थितीत दिसणारे फरक हळू हळू कमी होत असतात. ग्रंथीयामध्ये असणारे संयुक्तजाल वाढून त्यापासून नवीन पेशी काष्ठाकडे तसेंच तंतुकाष्ठाकडे जमत जातात. तंतुकाष्ठ आपले दोन्ही अंगास वाढते. तसेंच काष्ठ दोन्ही बाजूंस वाढून पसरत जाते. तंतुकाष्ठ व काष्ठ ही दोन्ही द्विगुणित होतात. दोहोंमध्ये पेशीवर्धक संयुक्तपदर असतो. त्यामुळे, पूर्णग्रंथी होण्यास फारसें कठीण पडत नाही. तंतुकाष्ठाचे खाली संयुक्तपदर असून, नंतर काष्ठ येतें. येणेप्रमाणे त्यापासून पूर्णग्रंथी तयार होतात. पूर्णग्रंथीची संख्या पूर्वीइतकीच कायम असते. कारण एक भाग तंतुकाष्ठ व एक भाग काष्ठ असे दोन भाग मिळून ग्रंथी बनल्यामुळे त्या द्विगुणित होण्याचा परिणाम संख्यावाढीकडे न होता, त्यापासून पूर्वीची संख्या कायम राहते. जशी जशी मुळांत दुय्यम वाढ होऊ लागते, त्याप्रमाणे मध्यभागी असलेलें भेंड ( Pith ) पूर्वीप्रमाणे आढळत नाही, तेही कमी होत असते. प्रथमकाष्ठाच्या चोहोबाजूंकडे काष्ठपेशी वाढत गेल्यामुळे ते आपले पूर्वीचें बाह्यस्थान सोडून आतील बाजूस आल्यासारखे दिसू लागते, व पुढे तर नवीन काष्ठपेशींची वाढ बाहेरच होत गेल्यामुळे, ते कायमचे आंतील भागांत राहते. ग्रंथीची रचना आंत अरुंद व बाहेर रुंद असते. सर्व ग्रंथी वर्तुलारुतीतच परस्पर चिकटल्या असतात. एकंदरीत प्राथमिक व टुय्यम वाढीत पुष्कळ फरक होत जातात, हे वरील विवेचनावरून स्पष्ट कळेल. मुळाचा आडवा छेद न घेतां तो सरळ उभा घेऊन सूक्ष्मदर्शकयंत्रामध्ये पाहिला असतां, पहिल्याप्रमाणे पेशीजाले लांबट व दीर्घ स्थितीत आडळतील. तंतुकाष्ठांत चाळणीदार नळ्या, काष्ठांमध्ये फिरकीदार व वळेदार वाहिन्या, पाहण्यास आढळतात. बाकी मुख्य तत्त्वांत फरक नसतो. नूतन काष्ठांत खांचेदार वाहिन्या व प्रथम काष्ठांत वळेदार अगर फिरकीदार वाहिन्या असतात. प्रथम व नूतन काष्ठ ओलखण्यास ह्यामुळे मुळभ पडते. शेवटले अग्र वरच्याप्रमाणेच सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिले असता, त्यांत चार किंवा पांच संरक्षक पदर आढळतात. आंत वाढती पेशी (Growing cell ) असते. कधी कधी अमाची बाह्यरचना टोपीसारखीच असते, हे पूर्वी