पान:वनस्पतीविचार.djvu/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८ वें]. पेशीजाल ( Tissue). मऊ (Soft ) व कठिण ( Hard ) असे दोन प्रकारचे पदर तंतुकाष्ठांत असतात. मऊ तंतुकाष्ठ संवर्धक पदराजवळ असून त्यापासूनच त्याची उत्पत्ति होत असते. येथील पेशी मुदु समपरिमाणी ( Parenchymatous ) असतात. यामध्ये पुढे चाळणीदार नळ्या ( Sieve tubes ) उत्पन्न होत जातात. ग्रंथीच्या बाह्य बाजूकडे कठिण तंतुकाष्ठ असते. ह्याच्या पेशी लंब असून जाड कातडीच्या असतात. काष्ठाप्रमाणे फिरकीदार, वळेदार वगैरे वाहिन्या नसून फक्त मृदुभागांत चाळणीदार नळ्या असतात. पेशीवर पेशी रचून मध्य पडदे पूर्णपणे न गळता छिद्रमय होऊन त्यास चाळणीदार आकार येतो. -- संवर्धक पदरांतील पेशी द्विधा होत गेल्याकारणाने पेशींची संख्या अधिक होऊन काष्ठ व तंतुकाष्ठ ही दोन्ही वाढतात. म्हणनच द्विदलधान्य वनस्पति अधिक अधिक रुंद होत जाते. संवर्धक पदर एकदल वनस्पतींत नसल्यामुळे खोडाची रुंदी वाढत नाही. . कधी कधी तंतुकाष्ठांचे पदर ग्रंथीमध्ये दोन्ही टोकास असतात. म्हणजे प्रथम तंतुकाष्ठ, नंतर संवर्धक पदर व पुढे काष्ठ असून पुन: तंतुकाष्ठ असते, ग्रंथींत काष्ठांचे दोन्ही अंगास तंतुकाष्ठ असते. दोडके, भोपळा, कारली वगैरे जातीच्या वेळांत असली रचना असते. तसेंच काष्ठ ( Xylem ) व तंतुकाष्ठ परस्पर एकमेकाच्या बाजूस न आढळतां कधी कधी काष्ठाभोंवतीं तंतुकाष्ठ अथवा उलट तंतकाष्ठाभोवती काष्ठ आढळते. जसेंः-दर्शना, फर्न. दर्शनामध्ये ग्रंथीच्या मध्यभागी तंतुकाष्ठ असून सभोंवती काष्ठा वेष्टण असते, व फर्नमध्ये सभोंवतीं तंतुकाष्ठ असून मध्यभागी काष्ठ असतें. - खरोखर ग्रंथी सालीच्या पेशीजालांत बुडालेल्या असतात. एकदल वनस्पतींत ग्रंथी मेंडाळभागांत बुडून जातात. तसेंच द्विदलवनस्पतींत मध्यभागी भेंड असून बाह्यांगास साल असते. म्हणजे ग्रंथी या दोहोंमध्ये आढळतात.