पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/550

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आगरकरांची श्राद्धतिथि. ५३३ सध्यांच्या कालीं डझनांनीं सांपडण्यास हरकत नाहीं. आगरकरांची योग्यता एम्. ए. होण्यांत नाहीं. ग्रंथवाचनांत नाहीं, महाराष्ट्रलखनपटुत्वांत नाहीं, आणि आमच्या मर्त त्यांनीं * सुधारक ? पत्र काढले व चालवलें यातही नाहीं. बिचारा सुधारक त्यांच्यामागेंही कसाबसा चालला होता, आणि सुधारणेचे प्रतिपादन करणारेच नव्हेत तर आचरण करणारेही सध्यां पुष्कळ आहेत किंवा होतील. तथापि आगरकरासारखा पुरुष त्यांच्यांत क्वचित्च सापडेल असे म्हणण्यास आम्हांस कांहींएक हरकत दिसत नाहीं. कै. माधवराव रानडे यांच्यामागून हायकोर्टाचे जज्ज पुष्कळ झाले व होतील. पण माधवरावजींचा मोठेपणा ज्याप्रमाणें न्यायमूर्तित्वांत नव्हता त्याचप्रमाणे आगरकराचीही गोष्ट होय. सुधारणेचीं मर्ते त्यानीं निभांडपणे व कित्येकदा उच्छृखलपणेही प्रतिपादन केलीं; पण हें काहीं त्यांच्या मोठेपणाचे लक्षण नव्हे. परिस्थितीचा गुलाम न बनता परिस्थितीला यथासंभव यथाशक्ति व यावच्छक्य आपल्या ताब्यात आणण्यास जेो मनोनिग्रह, स्वार्थत्याग, निलीभीपणा आणि धैर्य लागतें तें ज्याच्या अंगांत आहे; आणि दुःखाची अथवा संकटाची भीति अगर पर्वा न बाळगता जेो आपल्याठायीं असणा-या या सद्गुणाचा लोकोपयोगार्थ उपयेोग करतो तोच मोठा म्हणावयाचा. गोपाळराव आगरकर हे या कोटीतले होते, व म्हणूनच १८९५ साली त्याचा मृत्युलेख लिहिताना त्याच्या अॅगच्या वरील सद्गुणांसच आम्ही प्रमुखस्थान दिले होतें. मनुष्य जें काहीं कर्म करतो तें नेहमींच सफल होत असते असे नाहीं, अगर त्यानें प्रतिपादन केलेली मतें नेहमींच अक्षय्य असतात असेही नाहीं. विचार आणि मतें हीं मनाचीं पाघरूणें होत असें जे एका पाश्चात्य ग्रंथकाराने म्हटले आहे तेंच खरे. देशकालानुसार मनुष्याचे विचार आज एक तर उद्या दुसरे होतील; आणि त्याच्या हातून घडणाच्या क्रियेसही तोच न्याय लागू आहे. पण सत्पुरुषाचा मोठेपणा त्याच्या स्वतःसिद्ध किंवा कमावलेल्या मनात आहे; आणि हेंच तत्त्व शिरोभागीं दिलेल्या भर्तृहरीच्या लोकात ग्रथित केलेले आहे. मनुष्याला मोठे केव्हां व कशासाठीं म्हणार्वे याचे तत्त्व लक्षात न बाळगल्यामुळे गोपाळराव आगरकरांचीं * मनेारंजना ' च्या खास अकांत जीं चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत तीं बहुतेक एकागी आणि काहीं ठिकाणीं तर निवळ चुकीचीं आहेत. अलीकडे या चरित्रकारांची अशी एक पद्धत पडून गेली आहे कीं, आपल्या चरित्रनायकाशीं ज्यांचा विरोध येतो, त्याना कांहीतरी दूषण। ठेवून त्यांतच आपल्या चरित्र-नायकाचा मोठेपणा आहे असे सिद्ध करावयाचे. आमच्या मते चरित्रलखनाची ही पद्धत अप्रशंसनीय होय. जगामध्यें मतवैचित्र्य असणें ही गोष्ट इतकी स्वाभाविक आहे कीं, स्वयंवरात अनेक चांगले राजे आले असता त्यांना सोडून अजालाच इंदुमतीनें का वरावें याचे कारण देताना कालीदासास “ नासौ न काम्यो न च वेद सम्यक् । द्रष्ट हि सा भिन्नरुचिहिँ लोकः ' या तत्त्वावर निर्वाह करून घ्यावा लागला आहे. पण गोपाळरावांच्या बहुतेक