पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/470

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. ४५३ निर्विवाद आहे कीं, याज्ञवल्क्यादिकांनी ह्या ब्राह्मणग्रंथांस व्यवस्थित रूप देऊन ते प्रसिद्ध केले तेव्हां भारतीयुद्धाची कथा आत घालणें अशक्य होतें. कसैहा असो; भारतांतील व हरीवंशातील जीं प्रमाणें वर दिलीं अहेत त्यांवरून दोन जनमेजय मानणें जरूर आहे; आणि त्याप्रमाणें दोन जनमेजय धरले म्हणजे युरोपियन पंडिताच्या वर दिलेल्या कोटिक्रमांत कांहींच अर्थ रहात नाहीं. भारतीययुद्ध जर वैदिक ब्राह्मण ग्रथांच्याकालानंतर झाले तर त्यात त्याचा उल्लेख कोठून येणार ? रा. रा. वैद्य याच्या पुस्तकात दुसरी एक अशाच प्रकारची चूक आहे; तिचा आज उल्लेख करून पुढील लेखात त्यांनीं दिलेल्या भारतीय युद्धकालाचे विवेचन करूं. ही चूक गर्गाच्या कालाबद्दलची होय. गगै ज्योतिषी खिस्ती शकापूर्वी १५० किंवा २०० वर्षे झाला असावा, असें रा. वैद्य यानीं मद्रासेंतील मि. आयर याचे ग्रंथावरून गृहीत घेतले आहे. यास आधार ते असे देतात कीं, वृद्धगार्गी-सहिता म्हणून जो फलज्येोतिषाचा ग्रंथ हल्लीं उपलब्ध आहे त्यातील युगपुराणात अशोकाचा पणतू शालिशूक याचा उल्लेख असून पुढे यवन राजे अयोध्या घेतील असें म्हटले आहे; पण शकराजांचा उल्लेख कोठे केलेला नाहीं. यावरून मि. आयर यानीं असें अनुमान काढले आहे कीं, शकराजाच्या पूर्वी गर्गाने आपला ग्रथ केला असावा. मि. आयर यांनीं गृहीत धरलेली गोष्ट बरोबर असती, तर त्यानी काढलेले अनुमान बरोबर झाले असतें. पण गर्गसंहिता हा ग्रंथ आम्हीं पाहिला आहे; व त्यात शालिशूकाचा वगैरे जेथे उल्लेख आहे त्याच्याच पुढे शकराजाचे वर्णन असून शेवटीं विनष्ट शकराज्येच शून्या पृथ्वी भविष्यति । असा त्याच्या नाशाविषयीं स्पष्ट निर्देश आहे. यावरून शकराजानंतर हल्लींच्या वृद्धगार्गीसंहिताचा हा भाग लिहिला असावा, असें जरूर मानार्वे लागतें, मॅक्समूलर याचेही मत असेंच आहे. गगनीं आपला ग्रंथ शककालानंतर लिहिला एवढे सिद्ध झाल्यावर * आसन्मघासु मनयः ’ इत्यादि वचनांचा अर्थ मि. आयर किंवा रा, वैद्य यानीं केला आहे त्याहून निराळाच करावा लागतो. पण यासंबंधानें स्थलसंकोचास्तव आज जास्त लिहिता येत नाहीं.

  • महाभारत नबर् ५.

कुरुवंशांत दोन जनमेजय असून एक मानल्यानें आणि गगांच्या कालासंबंधानें चुकी केल्यामुळे रा. वैद्य याच्या भारत युद्धकालाच्या अनुमानांत बराच

  • (केसरी, ता. २ माहे में १९०५ ).