पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमचे आधुनिक विद्वान् अकालीं कां मरतात ? १६१ आमचे आधुनिक विद्वान अकालीं की मरतात ? * गेल्या रविवारीं न्यायमूर्ति रा. ब. रानडे यांचे मुंबईस जें व्याख्यान झालें तें फार महत्त्वाचे होतें. डॉ. भाडारकर यांचे व्हाईसचान्सलर या नात्यानें युनिव्हर्सिटींत भाषण झाल्या दिवसापासून या विषयांकडे लोकाचे विशेष लक्ष लागलें आहे. कित्येकाच्या मतें डॅॉक्टरसाहेबांनी काढलेलीं अनुमानें सर्वाशी ग्राह्य नव्हतीं, पण ज्या रीतीनें डॅॉक्टरसाहेबानीं या प्रश्नाचा ऊहापोह केला होता, तशाच रीतीने परंतु त्याहून विशेष सूक्ष्म दृष्टया व शोधक बुद्धीनें या विषयाचे पुनः विवेचन करून काय सिद्धांत निघतात हें कोणी तरी एका चागल्या विद्वानार्ने पुन: पाहावयास पाहिजे होतें. न्यायमूर्ति रा. ब. महादेव गोविंद रानडे यान हे काम करण्याचे मनावर घेऊन बहुतेक प्रसिद्ध विद्वानास या संबंधाने आपले अभिप्राय कळविण्यास आज बरेच दिवसांपूर्वी पत्रे लिहिलीं होतीं; व विशेषत: करून त्यास असें विचारलें होतें कीं, ( १) ग्रॅज्युएट लोकापैकीं अकाली मेलेले आपणास किती गृहस्थ माहीत आहेत, व त्याच्या मृत्यूचीं कारणे काय ? आणि (२) ग्रॅज्युएट मंडळींतील किती लोकांनी इंग्रजीत अगर देशी भाषैत ग्रंथ प्रसिद्ध केल आहेत ? रा. ब. रानडे यांनीं एकंदर सुमारे चारशें पत्रे लिहिली होती, पैकी निरनिराळ्या ठिकाणच्या दक्षिणी, पार्श,ि गुजराथी वगैरे लोकाकडून सुमारे १३६ उत्तरें आलीं वहीं उत्तरें पाठविणारापैकी कित्येकानी बडोदें, सोलापूर, रत्नागिरी, भावनगर, अहमदाबाद, इंदूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, कराची, धुळे, हुसंगाबाद, शिकारपूर वगैरे ठिकाणीं ग्रॅज्युएट लोकाच्या सभा भरवून त्या सभांचे मत रावबहादुरास कळविले आहे. तेव्हा या उत्तरात दिलेल्या माहितीपासून जीं अनुमार्ने निघतील तीं एकतफीं अगर एकपक्षीय आहेत अशी तक्रार करण्यास आतां कोणतेही कारण राहिलें नाहीं. युनिव्हर्सिटीतूत पास झालेले बरेच लोक अकालीं मरावे आणि जिवेत राहिलेल्या लोकात ग्रंथकर्तृत्वादि विद्याव्यासंग करण्याची मुळींच आभरुाचे किंवा शक्ति नसावी हे दोन आक्षेप खरे असल्यास ते आधुनिक विद्वानांस भूषणास्पद नसून ते दूर करण्याचा त्यानीं प्रयत्न केला पाहिजे. असें जें रा. ब. रानडे यांनीं बोलून दाखविलें तें आम्हास पूर्णपणे मान्य आहे. प्रतिवर्षी विद्येर्ने संस्कृत झालेल्या लोकांपैकीं बरेच लोक मृत्युच्यामुखीं पडावेंत हें कांही राष्ट्राचे सामान्य दुर्दैव नव्हे, व केवळ गृहादिकांच्या गतिस्थितिमुळे मनुष्यास

  • केसरी ता. १७ एप्रेिल १८९४.
  • e