पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देशी भाषांस उत्तेजन देण्यास युनिव्हर्सिटीनें काय केलें पाहिजे १५९ असें वर सांगितलेंच आहे. जो माल खपतो तो पिकतो असा जो सर्वसामान्य नियम आहे तोच ग्रंथरचनेसही लागू पडतो. परंतु असे जरी आहे तरी युनिव्हर्सिटींत निदान कांहीं विषयाचे अध्ययन देशी भाषांतून झाल्यानें त्या भाषांस थोडेंबहुत तरी खास उत्तेजन मिळेल अशी आमची समजूत आहे. अमुक एक विषय कॉलेजांतून देशी भाषांच्या द्वारें शिकवितात असें झाल्यावर देशी भाषांत त्या विषयावर लिहिलेली पुस्तके खपण्यास हें एक मुख्य साधनच होतें, आणि विद्याथ्याँस सदर विषयांची उत्तरें देशी भाषात लिहिणे जरूर असल्यामुळे त्याचीही ती विषय आपल्या भाषेकड तयार करण्यास प्रवृत्ति होते. इंग्रजा भाषा आजमितीस जी इतकी सुधारली आहे त्याचे कारण शेक्सपियर व मिल्टन होत असें जर कोणी म्हणेल तर तें अगदी चुकीचे आहे. इतिहास, शास्ने, कला, इत्यादिकाचा अभ्यास आणि सर्व जगभर पसरलेला इंग्रचाचा व्यापार आणि राज्य, त्याचे सूर्व व्यवहार इंग्रजी भाषेतच होत असल्यामुळे त्या भाषेच्या अंगी सहजच प्रेौढपणा व व्यापकता हे दोन गुण आले आहेत, व ते गुण तितक्या अंशानें देशी भाषेत येण्यास तसे व्यवहार देशी भाषेतून होऊं लागले पाहिजेत हें उघड आहे. इतके व्यवहार देशी भाषांतून होऊं लागणे आज शक्य नाहीं हें वर सागितलेंच आहे, तथापि युनिव्हर्सिटीन ती गोष्ट मनात आणून काही उपयोग नाहीं. हल्लीच्या राज्यपद्धतीमुळे इंग्रजीचे जितके ज्ञान सपादन करण्यास विद्याथ्यास आवश्यक आहे तितकें विद्याथ्याँस मिळतें की नाही हे पाहून नंतर बाकीच्या काही विषयाची परीक्षा देशी भाषातून घेण्यास युनिव्हर्सिटीस काही हरकत आहे अस आम्हास वाटत नाहीं. निरनिराळ्या विषयावर व्हावे तसे अद्याप ग्रंथ झाले नाहींत हैं खरै आहे. पण पाचपन्नास वर्षापूर्वी विलायतेंतही अशाच प्रकारची स्थिति होती, व अद्यापही पुष्कळ विषयाचे अध्ययन जर्मन व फ्रे च ग्रंथावरून करून त्याचीं उत्तरें विलायतेंतील विद्याथ्यांस इंग्रजी भाषेत लिहावी लागतात. मग आमच्याकडेच असा प्रकार कां होऊं देऊं नये हें आम्हास कळत नाही. निदान हिदुस्थानचा इतिहास, संस्कृत वगैरे विषयाचीं उत्तर देशी भाषेत लिहूं देण्यास तर कोणताच प्रत्यवाय दिसत नाहीं. आतां युनिव्हर्सिटीची रचना पाहता ही गोष्ट आजच साध्य होईल असे दिसत नाहीं, तथापि जर वर सागितल्याप्रमाणे सुधारणा होणें इष्ट असेल तर त्या दिशेनें जाण्याचा एव्हांपासून थोडथोडा प्रयत्न केला पाहिजे. पंजाबात ज्याप्रमाणें देशी भाषातून शिकून तयार झालेले बी. ए. व इंग्रजीतून शिकून तयार झालेले बी. ए. असा भेद आहे, व त्या भदामुळे त्याची योग्यता कमी जास्ती समजतात तशा प्रकारचा भद आमच्याकडे न होईल तर बरें. म्हणजे अर्थातूच सर्व विषय देशीं भाषांतून शिकवावे अगर विद्याथ्याँस त्यांचीं उत्तरें देशी भाषांतून देण्यास सांगावी असा नियम करण्यास युनिव्हर्सिटीस आम्हांस सांगतां येणार नाहीं, पण त्यामुळे एक दोन अथवा दोन तीन विषयांचीं उत्तरें