पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ लो० टिळकांचे केसरीतील लेख मंडळी परिक्षा संपल्याबरोबरच पुस्तकास रजा देऊं लागल्यास त्यांत नवल तें कोणतें ? ही स्थिति सुधारून आमच्या युनिव्हर्सिटीस विद्वानांच्या मेळ्याचे जर्ण करून स्वरूप येईल तशी तजवीज डेॉक्टर भांडारकरासारख्या नेटिव्ह व्हाइसचान्सलराच्या कारकीर्दीतच हेोणे शक्य व इष्ट आहे, असे आमच्या मर्त आहे. करितां डॉ. भांडारकर यानी आपल्या भाषणांत या विषयाचा जसा विचार केला आहे तसाच तो पुढे चालू ठेवून आमच्या युनिव्हर्सिटीस जर्मनीतील युनिव्हसिंटाची योग्यता आणण्याचा होईल तेवढी तजवीज करावी अशी त्यास आमची विनंती आहे. आमचे विद्वान् लोक अल्पायुषी का होतात. हा डॉ. भांडारकर यांच्या भाषणातील दुसरा मुद्दा होय. डॉक्टर साहेबानी सन १८६२-८० पर्यंत अठरा वर्षीत जे लोक एम्. ए. आणि बी. ए. ची परीक्षा पास झाल त्याची जी माहिती मिळविली आहे त्यावरून असें दिसून येते कीं, एम्. ए पैकीं पंचवीस महाराष्ट्रातील लोक असून त्यातले अकरा म्हणजे शेकडा चव्वेचाळीस लोक मरण पावले आणि तितक्याच मुदतीत पास झालेल्या अठरा पार्शी गृहस्थापैकीं तीन म्हणजे शेकडा १६ मृत्यु पावले. याच मुदतींत एकंदर बी. ए. पास झालेल्या १९३ दक्षिणी लोकापैकी चाळीस, चाळीस गुजराथ्यापैकी नऊ, आणि त्रेसष्ट पाश्यापैकी सहा पाशीं मले. म्हणजे दक्षिणी शेकडा वीस, गुजराथी शैकडा बावीस आणि पाशीं सुमारें शेकडा नऊ मरण पावतात, असे दिसून येतें. हें आकडे सागून मग ग्रॅज्युएट इतके कमी का मरतात याचे कारण डॉक्टरसाहेबानीं सांगितले. ते म्हणाल कीं, पाशीं लोक अधिक चागलें अन्न खातात, व्यायाम करतात आणि उशीरा लग्न करतात यामुळे त्याची प्रकृति सुदृढ राहते व ते दीर्घायुषी होतात. डॉक्टरसाहेबाचे आकडे व त्याचे अनुमान ही कितपत बिनचूक आहे याची आम्हास बरीच शंका आहे. पाश#लोक आमच्यापेक्षा अधिक दिवस जगतात असे म्हणावे तर ग्लेंडस्टनसाहेबाप्रमाणे ऍशी, पंचायशी अगर नव्वद नव्वद वर्षाचे पाशीं मुत्सद्दी अगर व्यापारी ह्यात असून एकसारखे काम करीत असल्याचे आमच्या कोठे आढळांत नाहीं. हिंदू लोकांत तरः-- आकर्ण पालितः दयामेो वयसाइीति पंचकः । रणे पथैरचद् द्रोणो वृद्धः षेोडशवर्षवत् ॥ अशा तच्हेचे योद्धे अगर मुत्सद्दी भारती युद्धानंतर फारसे झाल्याचे इतिहासांत दिसत नाहीं. द्रोणाचार्याचे हें वर्णन हल्लीं ग्लेंडस्टनसाहेबांस मात्र अगदीं अक्षरश: लागू पडते ! असो, मराठयाचा इतिहास घेतला तर साठाच्यावर ज्याची मजल गेलेली आहे असा एकही वीर अगर मुत्सद्दी सांपडणे कठीण आहे. शिवाजी आपल्या वयाच्या लेपन्नाव्याच वर्षी मरण पावला, आणि बाजीराव, राघोबादादा आणि नाना फडणवीस हे साठीच्या अांतच आटपले. ज्ञानदव आणि एकनाथ हे अगदीं अल्पायषीच होते. तुकाराम एकेचाळिसाव्या वर्षी मरण