पान:लोकहितवादी.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी ग्रंथरचना. ४५ काम करीत. आश्वलायन गृह्यसूत्राचे भाषांतर, ऐतिहासिक गोष्टींचे तीन भाग ( हल्ली यांचा दोन भागांतच समावेश केला आहे.) पानपतची लढाई, गीतातत्त्व, हिंदुस्थानच्या आर्थीक परिस्थितीवरील कित्येक लेख, व सभांतून निरनिराळ्या वेळी अनेक प्रकारच्या विषयांवर दिलेली व्याख्याने ही सर्व या काळची आहेत. मनांत विचार आला की, तो व्यक्त कसा करावयाचा याची अडचण गोपाळरावजींना कधी वाटली नाही. विचाराचा अंकूर जोरदार असल्यामुळे व मनोभूमी पूर्वीच्या अनुभवाने चांगली तयार झालेली असल्यामुळे विचार स्पष्टपणे व जोराने बाहेर फुटे. जे जसें आठवेल तसें तें भराभर मोडीत लिहन काढावे व मग वामनरावांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे दुरुस्त्या करून स्वच्छ बालबोध प्रत तयार करावी असा क्रम असे. नाशीक, ठाणे, अलीबाग, मुंबई, इत्यादी ठिकाणी गोपाळरावजींच्या नोकरीची शेवटची चार वर्षे गेली असें वर सांगितलेंच आहे. या अवधीत सरकारकडून त्यांना अनेक रीतींनी मान मिळाला. सन १८७६ चे दिल्लीदरबारच्या प्रसंगी त्यांना रावबहादूर हा किताब मिळाला, पुढील वर्षी ते जे. पी. झाले, व त्याचे पुढील वर्षी मंबई विश्वविद्यालयाच्या सीनेटचे सभासद झाले. याच वर्षी क्याला ५५ वर्षे पुरीं होऊन गेल्यामुळे पेन्शन घेऊन ते पुण्यास कायमचे घरीं राहण्यास आले. या नंतरची त्यांची पुढील १७/१८ वर्षे सार्वजनीक हिताच्या अनेक व्यवसायांत व विशेषतः लेखनांत गेली. त्यांना आतां लिहिण्याला फुरसत जास्त सांपडे. तिचा काही तरी उपयोग करावा म्हणून त्यांनी पुण्यास आल्यानंतर लवकरच "लोकहितवादी" या नांवाचे स्वतंत्र मासीक पुस्तक काढण्यास सुरवात केली व त्यांतन राजस्थान, गुजराथ इत्यादि दशांचं इतिहास, पृथ्वीराज, दयानंद यांची चरित्रे व हिंदुस्थानच्या स्थानिक स्वराज्यासारखा प्रचलीत