Jump to content

पान:लोकमित्र १८९५.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( साचा:Center५९

कवृक्षाप्रमाणें आहेत. आणि बादशहा हे भ्रमराप्रमाणे सर्वांचा मधु सेवन करणारे आहेत. यांत शिवाजीस मु- द्दाम चंपकवृक्ष ठरविलें आहे. कारण,भ्रमर हा चंपकवृक्षास कधींच स्पर्श करीत नाहीं ! अर्थात् बा - दशहा जरी इतर राजांपासून कारभार घेत असला तरी तो शिवाजीपासून कांहीं एक घेऊ शकत नाहीं,हे स्पष्ट झालें.याप्रमाणें वर्णन आटोपल्या वर बादशहानें आणखी कांहीं एक वीररसपर काव्य ह्यणावयास सांगितलें. तेव्हां भूषणकवीनें बादशाही दरबारास योग्य अशा अदबीनें बादशहास विनंति केली कीं, "खुदावंतांनी आतां हात धुवून बसावें" बादशहानें विचारिलें " याचे कारण काय ?" तेव्हां चिंतामणकवीनें उत्तर दिलें " " हुजूर शृंगारप्रिय असल्याने वारंवार त्यांचा हात विजारीकडेस जातो. व आमचे बंधु वीररस वर्णन करूं लागले म्हणजे खात्रीने आपला हात मिशीवर जाईल. आणि तसला अपवित्र हात मिशीवर जाणे इष्ट नाहीं. याकरितां खाविंदांस तशी विनंति करण्यांत आली आहे. अधिको- उत्तराची खुदावंतांनी माफी करावी. " हे चिंतामण कवीचें भाषण ऐकून बादशहा रोषयुक्त स्वरानें म्हणाला " जर आमचा हात मिशीवर न गेला, तर आम्ही भूषण कवी- चा शिरच्छेद करूं. " भूषण कवीस आपल्या वर्णन- शक्तीची पूर्ण खात्री असल्यामुळे त्यानेही बादशहाचे म्हणण्यास रुकार देऊन आपल्या लोकोत्तर कवितारचने- च्या सामर्थ्यानें वीररस उभा करण्यास सुरुवात केली. अशा रीतीनें सहा कवीत्त झाल्यावर सातव्या कवितांत एकदम बादशहाचा हात वीर्यातिशयानें स्फुरण पावून