दादा आपल्या विद्येत प्रवीण असून मोठे कडक सूर्योपा- सक होते असें सांगतात. श्रीमंत रावबाजी हे आपल्याच दुर्गुणांनी संपूर्ण राज्यसंपदा हारवून जेव्हां गंगातीरीं ब्रह्मावतीच्या वाड्यांत आपल्या दुर्दैव समुद्राच्या लहरी मोजीत बसले, तेव्हां पुण्यांतील कित्येक स्वामिभक्त लोक . त्यांजवळ जाऊन राहिले. त्यांतच वर सांगितलेले मल्ल- विद्याविशारद जेठी बाळंभटदादा हेही होते.
ब्रह्मावर्त येथे बाळंभटदादा असतांना कोणीएक कर्ना- टक स्त्री तेथें आली. ती मल्लविद्येत अतीशय प्रविण होती. आणि तो दक्षिणेंत रामेश्वरापासून तो थेट उत्तर हिंदुस्था- नांत ब्रह्मावतीपर्यंत अनेक पैलवान लोकांशी कुस्त्या करून अजिंक्यपत्रे मिळवीत आली होती. तिच्याजवळ तिच्या बापाने तिला बक्षीस ह्मणून दिलेली मुबलक संप- त्ति होती. त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारें अन्नवस्त्राची उणीव नव्हती. तिजबरोबर तिचा एक भाऊ होता, तो वयाने तरुण, शरिराने चांगला सदृढ, आणि सुस्वरूप व तेजःपुंज असा होता. त्याचा पोषाख उंची भपकेदार, डोक्याला मंदील, पायांत तोडा असा होता. त्यास पाहतांच हा कोणी एखादा मोठा राजपुत्र असावा असें वाटे. या वेळेपर्यंत त्या स्त्रीनें लग्न केले नव्हते. जो कोणी आपणास मल्लयुद्धांत हारवील त्यासच आपला पति करावयाचा असा तिचा पण होता. तीही आपल्या भावाप्रमाणेंच अत्यंत सुरूप होती. तशांत तिला आजपर्यंत पुरुषसमा- गम झाला नसल्यामुळे एखाद्या लहान बालकाप्रमाणं तिचें सर्व शरीर बाळसेदार आणि गोंडस दिसे. अशा प्रकारची ती विलक्षण मोहिनी स्त्री बाळंभटदारांची कीर्ति ऐकून
पान:लोकमित्र १८९५.pdf/२३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २१ )