( ३ ) स्वराज्याचा मिळवाया घ्या हाती चरका ॥ ६ ॥ हिंदभूमीचे गरिब पुत्र त्या शेतकरी बंधूनां । अन्न नसें त्यां समयी देईल जीवन हा चरका ॥ ७ ॥ चरक्याची राष्ट्रीय पताका घेउनि दौडत चाला | स्वाव- लंबनाचा पथ चालुनि स्वातंत्र्या मिळवा || ८ || ( पढ़ पांचवें चाल-गजल ) पुढारी कोण जनतेचा | प्रश्न हा ठाकला पुढती ॥ धृ ॥ कर्मयोगी वीर गेला । दावुनी आत्मज्योतीला । करोनी कर्म निष्काम । जनांचें जाहला धाम ।। १ ।। 'जयाला जे असे शक्य । करावें तें' असे वाक्य । जयाच्या हो मुखी राहे । देश सेवाचि तो लाहे ॥ २ ॥ निमाला बाल या भूचा । निमाला दीप अंधांचा । शब्द त्याचा एक होता । जगाला धीर तो देता ॥ ३ ॥ महात्मा तो पुढे आला । जगाचा जो गुरू गमला । काढिले शस्त्र सत्याचें । जगीं जे मानिले साचें ॥ ४ ॥ शांति-संगें प्रेम ठेवा । दिला हाची जयें ठेवा | जयाच्या रक्षणासाठीं । पुण्य तें लागतें गाठीं ॥ ५ ॥ अशी त्याची कसोटी कीं । नुरे कोणी खरे बाकी । एकटा राहिला तोही । जनांना लाधला नाहीं ॥ ६ ॥ पुढे आले किती एक । तयांना मानिना लोक । राष्ट्र हे जाहले मूढ | कळेना काय हे गूढ ॥ ७ ॥
पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/५
Appearance