Jump to content

पान:लोकमान्य मेळा १९२३ ची पद्यावली.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(८) जामनी जातिल द्रव्यहि गेले गुलाम बनशिल त्यांचा "वैलहि गेला झोपा गेला" मराशेल मधिं तूं फुकाचा ॥१०॥ यास्तव मुळशी सत्याग्रहिं तूं सहाय करि रे भाई । पश्चात् बुद्धी घेईल प्राणा । जागृत होई होई ॥ ११ ॥ ( पद अकरावें चाल - विश्व वंशबणराज.) बंधुनो हात द्या रे । राष्ट्र कार्याला || धृ || दसकी लकडी एका बोजा । मदत करूं सकला ॥ १ ॥ दाहि दिशानी उडवूं गर्दी | लोक जागृतीला ॥ २ ॥ देश आपुला कुरण परांचें । आज कसा बनला ॥ ३ ॥ चुकते कोठे काय पाहिजे | पटवूं जनतेला ॥ ४ ॥ पुरे आतां तो साधा भोळा कारभार पहिला ॥ ५ ॥ ठका महाठक भेटे तेव्हां । पाय काटि पहिला ॥ ६ ॥ माझे माझे तुझेंहि माझें । हाच न्याय ठरला ॥ ७ ॥ दुःख टांगुनी वैशीवरती । दाखवुं जगताला ॥ ८ ॥ स्वस्थ बसे तो मरे तरी नच । विचारि कुणि त्याला ॥ ९ ॥ शांति- युगाला अवधी आहे । निर्णय हा झाला ॥ १० ॥ कार्यारंभी यशार्थ बंदूं । विघ्न-नाशनाला ॥ ११ ॥ ( पढ़ बारावें चाल- हा नारायण अडला ) जनता धुंद कशी जहाली । मोहें गचाळ ती बनली ॥धृ॥ प्रातःकाळी कपहि चहाचा । घशाखालिं नच उतरे ।