पान:लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हिंदी लोकांना लाथा मारल्या म्हणून काय झाले? त्यांच्या दहापाच लाथाही न सोसण्याइतके हिंदी मनुष्याने नादान कमकुवत राहावे ही काय रीत झाली? इत्यादी इत्यादी. परांजपे यांची वक्रोक्ति एकदा सुरू झाली म्हणजे मग ती वरील पद्धतीने कशी फैलावत जात असे त्याचा परिचय मराठी वाचकवर्गाला चांगलाच आहे. परंतु सांगण्याचा मुद्दा हा की, सरळ रागाने शिव्या दिल्या व नावे ठेवली तर मनुष्य जितके चिडते त्यापेक्षा अशा वक्रोक्तीच्या म्हणजे कुत्सित विनोदाने अधिक चिडतो याचे एकप्रकारे प्रत्यंतरच मिळाले. कारण याच विषयावर मराठ्यात मी या वर्षात काही नाही तरी दहावीस वेळा स्फुटे किंवा अग्रलेख लिहिले असतील. आणि माझीच गोष्ट म्हणून मी सांगत नाही, पण तेव्हाचे ते लेख आजही वाचतांना मी यर्थाथपणे असे म्हणू शकतो की ते लेख पुष्कळच कडक होते. अलीकडच्या केसरी-मराठ्यातील लेखांपेक्षा ते कमी कडक होते असे मुळीच वाटत नाही. आणि त्यांच्यावर खटले कसे झाले नाहीत याचे एकप्रकारे आश्चर्यच वाटते. ते कसेही असो. माझ्याप्रमाणे शिवरापंतांवरही प्रेस-कमिटीचा हात पडला. कमिटीचे अध्यक्ष डिस्ट्रिक्ट मॅजिस्टेट यांनी परांजपे यांना एक दिवस बोलावणे पाठविले व सरळ असे विचारले की, “या तुमच्या लेखाबद्दल माफी मागता की नाही? बोला.' पुढील आठवड्याच्या अंकात त्यांनी माफी मागताना सरकारला दोष दिला, व आपली टीका यथार्थ होती असाही युक्तिवाद केला. परंतु दिलगिरी प्रदर्शित केली, यामुळे युक्तिवादाला फारशी किंमत उरली नाही. या गोष्टीचा मराठ्यात उल्लेख करून मी फक्त इतकेच म्हटले की, “काळकर्त्यांनी माफी मागून टाकल्यामुळे त्यांचा लेख राजद्रोहाच्या कलमाखाली येतो की नाही हे पाहण्याची संधी उरली नाही.” “मी लिहिले ते विनोदबुद्धीने लिहिले. त्यात त्या विषयावर इतर लोक टीका करतात त्याहून विशेष वावगे असे काही नाही. आणि प्रेस-कमिटी झाली म्हणून तिने विनोदी लिहिणे काय म्हणून वावगे मानावे? जाऊ दयाच हा वाद कोर्टापुढे असे म्हणून, माफी न मागता, परांजपे यांनी यापुढील जबाबदारी प्रेस कमिटीवर टाकली असती तर बरे झाले असते असा माझा रोख होता. पण कोर्टही उघड व शुद्ध रागापेक्षा कुत्सित विनोदालाच अधिक चिडते! असो. एकंदर धोरण असे दिसले की, आज प्रेस-कमिटी नेमली तिच्या अनुभवावरून सरकार पुढे मागे प्रेस-सेन्सॉरशिप स्थापण्याचा विचार करीत असावे. परांजपे यांनी माफी मागितली याबद्दल पुष्कळांना खेद झाला व त्यांच्या विनोदप्रियेतला थोडा कमीपणा आला. | आपण तुरुंगात असतानाही बाहेर आपली वर्तमानपत्रे कशी काय चालली आहेत याची चौकशी टिळक अर्थात् करीत. घरच्या खुशालीचा मामुली प्रश्न होताच, धोंडोपंताना त्यांचा पुढचा प्रश्न वर्तमानपत्रांसंबंधाचा असे. शिक्षेनंतर महापर्व/५१