पान:लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काय? बरे, बोलावून इकडले तिकडले मराठ्यांतले पुष्कळ लेख काढून हा असा वाईट आहे तो तसा वाईट आहे असे त्यांनी सांगितले. पण त्याला मीही कशी उत्तरे दिली हे साहेब जाणतातच. ती उत्तरे किंबहुना ते सर्व संभाषण प्रसिद्ध करण्याला मी तयार असता मॅजिस्ट्रेटसाहेबांनी मात्र तयार न व्हावे हे आश्चर्य नाही काय? मॅजिस्ट्रेटनी भेटीला बोलावले आणि आम्ही संपादक लोक गेलो तरी पंचाईत. भेटीला गेलो म्हणजे त्यांनी आढयतेने बोलावे. पण आम्हालाही स्वाभिमान नसतो असे नाही. आम्हीही उत्तरास उत्तर देतो. मग ती छापण्याला हरकत का असावी? आम्ही लिहितो त्यात काही गुन्हा असेल तर आमच्यावर खटला करावा. पण तोंड दाबून खाजगी संभाषणाचा' हा बुक्क्याचा मार का? हे प्रकरण मी असे चव्हाट्यावर आणले त्याने फारच मौज झाली. हिंदुस्थानातील बहुतेक हिंदी पत्रांनी माझा अग्रलेख आणि हा सर्व पत्रव्यवहार प्रसिद्ध केला, व सरकारी कारावाईवर सडकून टीका केली. त्याचा परिणाम बराच चांगला झाला. कोणी म्हणाले, “केळकरांनी चांगलेच धैर्य दाखविले. कोणी म्हणाले, “केळकरांनी लॅबसाहेबाची अब्रू चांगलीच बाहेर काढली. हिंदुपत्राने तर असे म्हटले की, “लॅबसाहेबांनी केळकरांवर जो पाश टाकला त्यात स्वतः तेच बिचारे सापडले! असो. | लॅबसाहेबांच्या भेटीचा फिरून एकवेळ प्रसंग आला. त्याचे कारण ली वॉर्नरसाहेबांचे ‘हिंदी नागरिक' या नांवाचे पुस्तक प्रसिद्ध झाले होते त्यावर मी बरीच टीका केली होती.पण या भेटीत ते माझ्याशी जपून बोलले. यानंतर ते लवकरच बदलून गेले. पुढे ते कमिशनर व कौन्सिल मेंबर होऊन आले असता त्यांच्या माझ्या कारणपरत्वे भेटी होत. पण पूर्वीची डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची त्यांची उर्मटपणाची वृत्ती नव्हती. | यानंतर कमिशनर वुडबर्न यांनी मला असेच एकदा भेटीला बोलाविले. त्याचे कारण असे घडले. वायव्य सरहद्दीवरील युद्धात ब्रिटीश सैन्याला फारसे यश आले नाही याबद्दल चोहोकडे थट्टा होत होती. त्याप्रमाणे मीही मराठा पत्रात केली. भेटीतील संभाषणात त्यांनी माझी खात्री पटविण्याचा प्रयत्न केला की, इंग्रजी सैन्याचा खरोखरच जय झाला! मी म्हटले, “तो कसा?" साहेब म्हणाले, “आमचे सैन्य एका बाजूने टिहा प्रांतात शिरले व दुस-या बाजूने बाहेर पडले. त्यावर मी थट्टेने विचारले की, “एका बाजूने शिरून फक्त दुस-या बाजूने परत आपल्या मुलखात यावयाचे यालाच तुम्ही विजय म्हणणार की काय? मग हा प्रवास न करताच तुमच्या सैन्याला घरबसल्या आमचा जय झाला असे म्हणता आले नसते काय? तेव्हा वुडबर्नसाहेबांना खरोखरच हसू आले व त्या विषयावरचे भाषण संपवावे म्हणून ते इतकेच म्हणाले की, “केळकर, तुम्ही महापर्व | ४९