पान:लेखनपद्धति.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखनपध्दति .

 सर्वांनी एकमेकांस पत्र लिहिणें तीं कशी लिहावी याविषयी लहान मुलांस त्वरित बोध व्हावा त्या इच्छेनें माचीन लिहिण्याचे शिरस्ते जमवून ते येथे संक्षेपांत लिहितो.

साधारणरीति.

 पत्र लिहिणाराने पूर्वी ज्यास पत्र लिहिणें आहे त्याची आ- -णि आपली जात कोण व योग्यता कशी आहे याचा विचार करू न योग्यतेनुरूप माना किंवा मजकूर लिहिणें असेल तो लिहा- वा. सर्व जातीत पत्र लिहिणाराने आपले बापास तीर्थरूप व इतर वडिलांस तीर्थस्वरूप लिहून खाली आपत्ये किंवा बाळ- के असे लिहावें. व लहानास चिरंजीव व मित्रास राजश्री लि हावें.
 ब्राह्मणाने ब्राह्मणासमात्र नमस्कार अथवा साष्टांग नम- स्कार किंवा शिरसाष्टांगनमस्कार लिहावा. व ब्राह्मणाने इतर. जातीस किंवा इतर जातीनें ब्राह्मणास नमस्कार लिहू नये. असा पूर्वापार सांप्रदाय चालत आला आहे, व त्यास शास्त्रा धारही आहे. यास्तव बाल्यजातीखेरीज वरकडांनी एकमे- कांस योग्यतेनुरूप, प्रणाम, दंडवत, रामराम जयगोपाळ, जयकृष्ण, जयहर, नारायण, जयसीताराम, भगवत्स्मरण, शि वशरणार्थ, शरणशरणार्थ, नमोरक्त, आशिर्वाद याप्रमाणें लि- हावे.
 जो आपले पेक्षां विद्येने किंवा द्रव्येकरून अथवा पदवी किं वा योग्यता येणेंकरून श्रेष्ठ असेल त्यास विनंतिपर्यंत लिहिल्यावर पुढे उपरी ह्मणून लिहू नये, विनंति येथील कूशळ असे लिहावें
 स्त्रियांनी स्त्रियांस अथवा पुरुषांनी स्त्रियांस लिहिणें झाल्या स जिचा भतार आहे तिला सौभाग्यवती व जिचा प्रतार नाहीं तिला गंगाभागिर्थी म्हणून लिहावें. कुमारिका ह्मणजे जिचे लग्न