Jump to content

पान:लक्ष उर्मी (Laksh Urmi).pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मामा म्हणाले चल बघूया. मी शाळेत गेल्यावर ते १२ वाजता बँकेतून शाळेत आले. सर्व टीचर खूपच घाबरल्या. कारण त्यांना वाटले नबा साहेब आला. हेडबाई उठल्या. त्यांनी आपली खुर्ची बसायला दिली. मग मामांच्या लक्षात आलं व त्यांनी जमू लागली. मी पाचवीत गेले. मला खास आठवत नाही कारण स्वातंत्र्य मिळलं ४७ ला ते तेंव्हा मी घरातच होते. मुडलगीला म्हणजे मी ४८ ला बेळगावला गेले. पहिला स्वातंत्र्यदिन तिथं साजरा केला. १४ ऑगस्ट घरात रेडिओ आणला. सकाळी ६-७ वाजता लतानं रेडिओवर गाणं म्हंटलं. हे सगळं आठवतं. पण नाव कोणत्या इयत्तेत घातलं ते आठवत नाही. एक वर्ष बाई बेटगेरी होत्या. म्हणजे तिसरीतच असणार. चौथीला कोरगांवकरबाई होत्या. थोड्या दिवसांनी त्यांची बदली झाली. त्या खूप छान शिकवायच्या. त्यांची बदली एक नंबर शाळेत झाली. त्यांनी आम्हा मुलींना पाचवीला त्या शाळेत यायला सांगितले. आम्ही बऱ्याच मली कोरगावकर बाईंनी सांगितल्याप्रमाणे एक नंबर शाळा मुलींची मारुती गल्ली येथे जाऊ लागलो व सांगितल्याप्रमाणे त्या बाईंनीच आमचा वर्गही मागून घेतला. शाळा बरीच लांब पडायची. मधल्या सुट्टीत पळत येऊन जेवण करून परत पळत शाळा गाठायची. पण अभ्यास चांगला चालला होता. मामा बँकेतच होते. घरात बाबू असायचा. तो ६ महिन्यांनी वर्षांनी भांडून, रुसून गावाला जायचा व परत आपणच यायचा. पण असला की खूप प्रेमाने सर्व करायचा. माझ्यावर पण कामाचा ताण पडायचाच. शेगडी (कोळशाची) वर स्वयंपाक असायचा. मी ५-६ कप चहा करायला ठेवला. सकाळी उठल्या उठल्या, मामांना, बिछान्यात चहा लागायचा. त्यामुळे चहा मीच करायचे, चहा उकळला, तो उतरवताना सगळा पायावर पडला. मला आंबू किंवा मामा रागावतील या भीतीने मी ओरडलेसुद्धा नाही. पाय धरून गप्प बसले. डोळ्यातून पाणी वाहात होते. मामा मला शांती शांती हाका मारतात पण मला ओ म्हणता येईना. शेवटी ते रागाने उठून आले तर चहा चोथ्यासकट पायावर पडलेला व मी रडते आहे. त्यांना वाईट वाटले. पण त्यांचं वाक्य अजून आठवतं,"अगं, ६-७ कप उकळता चहा पायावर पडला तर, निदान जोरात ओरडशील की नाही, माणूस आहेस की कोण? एवढी सहनशक्ती तुझ्यात." पण पुढच्या सर्व आयुष्यात या सहनशक्तीमुळेच मी यशस्वी झाले व मी अजात शत्रू म्हणतात तसे मला एकही शत्रू नाही. मला कुणी माणूस वाईट दिसत नाही. कुणी वाईट वागलंच तर त्याला काही दुःख असेल, त्रास असेल म्हणून तो तसा वागला असेल. मी कधी वर्गात कुणाची गट्टी फू वगैरे करत नसे. सर्वांशी बोलायची. एकदा मात्र केळकर बागेतल्या बोरकर नावाच्या मैत्रिणीशी मी गट्टी फू केली, कारण तिनं मला मी पाचवीत नापास झाले असं सांगितलं म्हणून. बिचारीची उगीच गट्टी केली. कारण मी खरंच नापास झाले होते व मला वाटले ती माझी कुचेष्टा करते आहे. मी शाळेत गेले तर मी खरंच नापास. मला खूप वाईट वाटले. मी घरात आल्यावर सांगितले तर मला बोलावलं, मी तर घाबरून गार. मग रिझल्टशीट काढून आणून माझे मार्क पाहून झाले. हेडबाई म्हणाल्या, हिला कसं काय नापास केलं. ही सर्व विषयात पास आहे व गणितात ३५ ऐवजी ३२ मार्क आहेत. ती प्रमोट होवू शकते. क्लास टीचर कोरगावकरना बोलावलं. त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, मी प्रमोट नाही करणार. हेडबाई म्हणाल्या, तुम्ही किंवा मी काय करणार? एका विषयात फेल असेल तर प्रमोट करण्याचा नियमच आहे व मला प्रमोट केले म्हणजे सहावीत घातले. कोरगांवकर बाईना राग आला व त्यांनी आपण घेतलेला सहावीचा वर्ग नाकारून दुसरा वर्ग घेतला. आमचा वर्ग फडणीसबाईंनी घेतला. मामांनी बाईंना माझे गणित सुधारण्यासाठी क्लास लावायचं कबूल केलं व त्याप्रमाणे बोरकर बाईच्याकडे क्लासला पाठवलं व माझं गणित उत्तम झालं व माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या कोरगावकरबाई मात्र माझ्याशी बोलायच्या बंद झाल्या. त्यांचं रागावण्याचं कारण होतं, मी २-३ महिने शाळा चुकवली याचं. पण मी घरी बसून अभ्यास करतच होते व शाळा का चुकवली याचं कारण त्यांनी विचारलं असतं तर त्या रागावल्या नसत्या. आता मी २-३ महिने शाळा का चुकवली त्याला कारण तसचं गंभीर होतं. एक दिवस रात्री ११ च्या सुमारास राडवर लग्नाची वरात वाजत आली व आंबूनी मला उठवलं. खूप मोठी वरात आली आहे. बघूया चल. एवढं का उठवलं तर तिला खाली अंधारात जाऊन दार उघडायला भीती. मी मात्र प्रथम पासून खूप धीट, घाबरणे, वगैरे नाही. घरात लाईटचं फिटींग होऊन दोन दिवसापूर्वी लाईट आलेले. मी उठले. व्हरांड्यातला लाईट लावला. आंबूपण आली. एल आकाराचा जिना उतरून बाहेरचे दार उघडायचे. पहिल्या ५-६ पायऱ्या उतरले व वळून खाली चौकात जायला पायऱ्या उतरत असताना मला तिथं कुणी उभं आहे असं दिसलं व मी माझा उतरण्याचा वेग कमी केला. आंबू लवकर दार उघडायला सांगत होती पण माझं लक्ष त्या माणसाकडे. हळूहळू त्याच्याजवळच्या पायरीवर गेले. तर अंधार बराच होता. पण ५-६ फूट उंच माणूस व लाल डोळे असा माणूस दिसू लागला. मला वाटलं नारायण (आंबूचा मामा) माझी मजा करतोय. म्हणून त्याच्या छातीजवळ होत नेऊ लागले. मला लक्षात आलं हा नारायण नाही. कारण तो इतका उंच नाही व एवढा शांत रहाणार नाही. माझा हात छातीला लागणार