पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाब आहे.
 भारताच्या २००१ च्या जनगणनेनुसार स्त्रीची पुरुषाच्या तुलनेली संख्या मागच्या दहा वर्षात काही प्रमाणात निश्चितपणे सुधारली आहे व त्या प्रमाणात हरवलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही शून्य ते सहा वयोगटातील मुलींचे प्रमाण प्रत्येक शंभर मुलामागे १९९१ च्या जनगणनेनुसार ९४.५ वरून ९२.७ पर्यंत घसरलेले आहे. केरळचा उज्ज्वल अपवाद वगळता हे प्रमाण पंजाब, गुजरथि, हरियाना व महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्यात अधिक वेगाने घसरलेले दिसून येते.
 सर्व पुरावे व निरीक्षणे लक्षात घेता मुलींच्या मृत्यूदरात वाढ झालेली नाही, तर तिची मुलाच्या जन्माच्या तुलनेत घट झाले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गर्भजल परीक्षा वा लिंग ठरविण्याचे उपलब्ध असलेल्या तंत्राचा मुलींचा गर्भ पाडण्यात होत असलेला वाढता वापर आहे, हे प्रो. सेन खेदाने नमूद करतात. जरी भारताच्या संसदेने या तंत्रज्ञानाचा गर्भाचे लिंग ठरविण्यासाठी वापर करण्यावर बंदी आणणारा कायदा संमत केला असला तरी त्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसून येत नाही.कारण खुद्द स्त्रियाच पुरावा देण्यास पुढे येत नाहीत. त्याचा बारकाईने अभ्यास करून प्रो. सेन जन्मदरातील लिंग असमानतेचे (Natal inequality) चे कारण म्हणून भारतीय मातांचा मुलीपेक्षा मुलाकडे (Male child preferance) असलेला ओढा हे देतात. यामुळे नजीकच्या काळात या प्रकारची लिंग असमानता फारशी कमी होण्याची लक्षणे नाहती. भारताच्या नियोजनकारांनी लिंग असमानतेच्या बदलत्या रूपाचे, म्हणजे मृत्यूदर असमानतेकडून जन्मदर असमानतेकडे परावर्तित होणा-या लिंगभेदाकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
 स्त्री शिक्षण व आर्थिक सशक्तीकरण हे जगभर सर्वत्र व रूढ झालेले उपाय जन्मदरातील असमानता नाहीशी होण्यासाठी फारसे उपयुक्त ठरताना दिसून येत नाहीत, हे पूर्व आशियायी राष्ट्रांकडे पाहिलं की स्पष्ट होतं. तेथे मोठ्या प्रमाणात स्त्री साक्षरता व आर्थिक स्वातंत्र्य असूनही४ ही लिंग असमानता कमी झालेली नाही. जगात प्रत्येक शंभर मुलामागे ९५ मुली जन्माला येण्याचे प्रमाण असताना, सिंगापूर व तैवान मध्ये मुलींच्या जन्माला येण्याचे प्रमाण ९२ आहे, दक्षिण कोरियामध्ये ८८ व चीनमध्ये ८६ आहे. तसेच एकूण स्त्रीचे पुरुषाच्या संख्येशी प्रमाण कोरियामध्ये ८८ व चीनमध्ये ८५ आहे. त्या तुलनेत २००१ च्या जनगणनेप्रमाणे भारतात स्त्रियांचे प्रमाण ९२.७ आहे, ते निश्चित उल्लेखनीय आहे, हे नमूद करायला प्रो. सेन विसरत नाहीत.

 तरीही त्यांचा चिंतेचा विषय वेगळा आहे. जरी भारताची एकूण टक्केवारी पूर्व आशियाई देशाच्या तुलनेत बरीच समाधानकारक असली तरी काही प्रांतात स्त्रीचे प्रमाणात भारतही अत्यंत वेगाने लिंगसापेक्ष गर्भपात (Sex selective abortion)

४२६ ■ लक्षदीप