पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/420

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही. (We are not interested in the possibilities of defeat, they don't exist.) एका शक्तिमान सम्राज्ञीबाबत ते वास्तव असलं तरी सामान्य जनाला, जे परिस्थितीनं पराभूत होतात, त्यासाठी ते खचितच लागू होत नाही. आणि प्रत्येक देश, जमात व वर्गातील स्त्रियांनाच प्रामुख्याने सर्व प्रकारच्या जगण्याच्या कठीण प्रसंगाला बळी पडावं लागतं, हे कटू असलं तरी विदारक स्वरूपाचं वास्तव आहे. अपाण ज्या विषमपूर्ण जगात जगत आहोत त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्त्री - पुरुषांची असमान जगण्याची दु:खं आणि ओझी होय. जी उघडपणे स्त्री विरुद्ध पक्षपाती आहेत. जगात जपान ते मोरोक्को, अमेरिका ते उझबेकिस्तान-पर्यंत सर्वत्र लिंगभेद व असमानता आहे. देश व सामाजातील लिंग असमानतेचे पैलू भिन्न, प्रसंगी सूक्ष्मतर स्वरूपाचे असतात. कारण ही देशातील आणि एकसंध अशी प्रक्रिया नाही, तर ती भिन्न तरीही परस्परसंबंधित अशा प्रश्नांची घट्ट गुंफलेली मालिका आहे. १. मृत्यू-दरातील असमानता (Mortality inequality) जगातील काही भागात लिंग असमानता ही जन्म व मृत्यू दराशी निगडित असून ती स्त्रीच्या संदर्भात पुरुषापेक्षा अधिक असलेल्या मृत्यूदराच्या निघृण रूपात दिसून येते आणि त्यामुळे एकूण लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण स्त्रीच्या तुलनेत वाढत आहे. हे प्रकर्षाने उत्तर आफ्रिका आणि आशिया, खास करून चीन व दक्षिण आशियाई देशात, त्यात भारताचा प्रमुख भाग आहे, हे दिसून येते. २. जन्म-दरातली असमानता (Natality inequality) | जगातील अनेक पुरुषप्रधान समाजात मुलीपेक्षा मुलाला महत्त्व दिले जात. आपलं जन्माला येणार मूल हे मुलगी नसावी, मुलगा असावा ही तीव्र, प्रबळ इच्छा लिंग असमानतेचा एक प्रमुख घटक असून आजच्या तंत्रविज्ञानाच्या जमान्यात ती केवळ इच्छा न राहता गर्भजल परीक्षेच्या तंत्रामुळे स्त्रीलिंगी अपत्य जन्माला येण्यापूर्वीच नष्ट केली जाण्याचे प्रमाण वाढत आहे. हा प्रवाह प्रामुख्याने पूर्व आशियाई राष्ट्रे आणि चीन व दक्षिण कोरीया मध्ये दिसून येतो. सिंगापूर व तैवान मध्येही तो लक्षणीय रूपात विद्यमान आहे. मागील काही वर्षात भारतासह दक्षिण आशियाई राष्ट्रातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भावस्थेच स्त्रीलिंग निर्मुलनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. प्रो. सेन या प्रक्रियेला उपहासानं हायटेक सेक्सीझम' म्हणतात. ३. मूलभूत सुविधेची असमानता । अनेक देशात जरी डेमोग्राफिक लक्षणे स्त्री विरुद्ध पक्षपाताची बाब दवात नसली तरी अनेक पद्धतीने तिच्याविरुद्धची लिंग असमानता समाजात विद्यमान आहे. तालिबान राजवटीतला अफगाणिस्थान हा जगाच्या पाठीवरचं एकमात्र असा देश होता, जिथं उघडपणे स्त्री शिक्षणावर बंदी प्रत्यक्षात आचरणात आणली गेला होता. आशिया, आफ्रिका व लॅटिन अमेरिका खंडात असे अनेक देश आहेत, जेथे मुलींना लक्षदीप ॥ ४१९