Jump to content

पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राणी इथेच वेगळे ठरतात. वासना टाळा. समाज, देशसेवा महत्त्वाची, प्रयत्नवादी माणसाला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आत्मोद्धार साधता येतो. सगळे विश्वच 'घर' मानावे. म्हणजे आत्मोन्नती साधते. राष्ट्राची सत्यस्थिती जाणून घ्यावी. आपण अनासक्त व्हावे, सेवेची दीक्षा घ्यावी आणि सर्वांची सेवा करावी. शिक्षण, आश्रम, सत्संग, परमार्थ संस्था शांततेसाठी राबवाव्यात. 'अंध, पंगू, महारोगी। अनाथ आणि वृध्द जगी। __ आश्रम चालवावं जागजागी। त्यांच्या सेवेचे।।। जनसेवा, राष्ट्रसेवा यास्तव वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम कारणी लावावा. प्रत्येकाने आपले जीवन सफल करून घ्यावे. - कर्मयोगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विसाव्या शतकातील महान कर्मयोगी होते. त्यांनी समाजामध्ये 'संत तोचि देव। आणि देव तोचि संत' अशी दृढश्रद्धा निर्माण केली. सर्वांसाठीच या संतांच चरित्र विशेष विलोभनीय आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अगदी साध्या वेषात वावरत असले; त्यांची राहणी अत्यंत साधी असली तरी 'वेष असावा बावळा, परि अंतरी नाना कळा' या न्यायाने त्यांनी केलेल्या निष्काम सेवेतील सौंदर्य मात्र तुमच्या आमच्या अंत:करणाला स्पर्श करीत. म्हणून संतचरणी लोक नतमस्तक होतात. नामवंत, श्रीमंत, समाधानी सगळ्यांनाच हे करावे लागते. (६२)