________________
'मी म्हणजे मम देश, राष्ट्र मी, कुटुंब, महि ही सारी।। तुकड्या म्हणे हे केले, तरीच खरी थोरी॥ येथे संत तुकडोजींनी 'वसुधैव कुटुम्बकम्' ही कल्पना मांडली आहे. असा व्यापक आणि विशाल दृष्टिकोण आपण जपला पाहिजे. 'धनाचा मोह' या काव्यात त्यांनी आजच्या देशपरिस्थितीच्या संदर्भात अतिशय मोलाचा उपदेश केला आहे. ‘धनाचा मोह नसू दे मनी।' रक्त असे हे कामकांचे, __ तोचि खरा घरधनी।।' लोक, देव दिसावा म्हणून दर्शनाला जातात, पण इथे देवच भीक मागतो की, 'माणूस द्या, मज माणूस द्या। तात्पर्य क्रांती ही विध्वंसासाठी नव्हे तर शांती प्राप्त व्हावी म्हणून करावयाची असते. परिवर्तन म्हणजे क्रांती - क्रांती म्हणजे रक्तपिपासा नव्हे, सेवाभाव हाच तिचा खरा पाया आहे. आमची क्रांती ही वीणा बनली पाहिजे असा हा बहुमोल संदेश संत तुकडोजी महाराजांचा आहे. राष्ट्रभाषेत ज्ञानदीप: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, जशी मराठी तशीच हिंदीतूनही आपली भजने लिहिली आहेत. त्यातही विलक्षण गोडवा आहे. त्याला सुमधुर चाली दिलेल्या आहेत. अखिल समाजाला संदेश देताना महाराजांनी अक्षरश: ज्ञानदीप उजळले आहेत. आपल्या जीवनातील, सगळ्या वस्तुमात्रांमध्ये, ज्ञान आणि (५७) -. --'