Jump to content

पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पानीका बा सांग सद्गुरुराया। भजा भजा गुरुराज। का सद्गुरुची निजकृपा व्हावया। - 'सद्गुरु नाथा। 'गजानन'। सद्गुरुनाथा। करि करुणा रे। सद्गुरुराया का रुसला बा। सद्गुरु आडकुजी समर्थ। सद्गुरुने नवल दावले।।' असे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, आपल्या अनेक भजनांमधून श्रीसद्गुरुंचे सामर्थ्य वर्णन केले आहे. त्यांच्या 'मोझरी' येथील आश्रमाचे नावही 'गुरुकुंज' असेच आहे. श्री सद्गुरु 'आडकुजी' समर्थ, हे संत तुकडोजी महाराजांचे गुरु होते. आपल्या एका भजनात तुकडोजी म्हणतात, 'श्री सद्गुरु 'आडकुजी' समर्था। किती आळवू तुला। प्राण सद्गदित कंठि जाहला।। असे ते कळवळून म्हणतात, आपल्या गुरुचे चरित्रच ते वर्णन करतात. ‘गाता तव महिमा न पुरे ना। जन्म नराचा खरा। अल्पमति, गाती तुज सुरवरा। हाच श्रद्धा भाव, त्यांनी सद्गुरुनाथ शेगावच्या गजानन महाराजांबद्दलच्या एका भजनातूनही अभिव्यक्त केला आहे. 'श्री सद्गुरुने नवल दाविले, न पाहवे, मज डोळा रे।' डोळियावाचुनि, दृश्य प्रगटले, उंच दाविला, माळा रे।। (५२)