१६१६ शक, भावलनाम संवत्सरे संभाजी त्याचा दुष्टमसलती *कलुशा हे दिल्लीरखानाकडून धरले गेले. पुढें माघ शु० ५रोजीं राजाराम यास रायगड येथें रामचंद्र पंत आमात्य व परशुराम त्रिंबक प्रतिनिधी या कारभाऱ्यांनीं राज्याभिषेक केला.
करून त्यांचे तैनांतीस फौजफाटा देऊन किल्यावरून ठिकठिकाणीं स्थापिले होते! तेव्हां खरे शिवाजी महाराजच मेले त्याची पक्की खात्री होण्यास इतका काळ गेला व पुढें महाराजांच्या अस्थी बरोबर हीबाई सती गेली. ग्रांटडफनें हिंदुस्थानचे इतिहासांत असें लिहिलें आहे कीं इस्टइंडिया कंपनीच्या मुंबईच्या गव्हर्नरास शिवाजीमहाराजांच्या मरणाच्या इतक्या वेळां खबरा अल्या आहेत की शेवटी त्यानीं असा निश्चय केला होता कीं जोपर्यंत शिवाजीचीं कृत्यें नाहींशी झालीं नाहींत तोपर्यंत शिवाजी मेलासा मानितां येणार नाहीं. ह्यावरून त्यावेळी शिवाजी मरून कितीदां जिंवत होत असेल हें आपणास चांगलें समजतें. मावळे लोकांत अशी समजूत आहे कीं शिवाजी महाराजांस भवानी प्रसन्न होती ती त्यास धन देत असे व पुनः जिवंत करित असे यासमजूतीसही हेंच कारण असावें.
*कलुशा हा कनोज ब्राह्मण होता. त्याची आणि संभाजीची ओळख मथुरची, अवरंगजेबाचे गुप्तकारस्थानानें कलुशा मराठ्याचे मराठ मोळयांत ह्मणजे संभाजांचे अगदीं अंतःपुरापर्यंत पोहोंचला होता. शिवाची महाराज जिवंत होते तोंपर्यंत या दुष्टाचे बीजबाहेर पडलें नाहीं. महाराज