Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६०)
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी

महाराज यांचे कारकिर्दीतल्या

कांही गोष्टींचें टिपण

 १५४५ शक, विजयनाम संवत्सरे शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
 १५७० शक, सर्वधारीनाम संवत्सरे श्रावण वद्य १ रोजीं शाहाजी महाराजांस धरून विजापुरकरांनीं अटकेंत टाकलें.
 १५७७ शक, मन्मथनामसंवत्सरे पौष वद्य १४ रोजीं जावळी घेतली.
 १५७९ शक, हेबळीनाम संवत्सरे चैत्र वद्य १० बेदर घेतली. पुढें ज्येष्ठ शुद्ध १२ संभाजी महाराजांचा जन्म झाला.
 १५८१ शक, वितारीनाम संवत्सरे आश्वीन शुद्ध ७ अफझुलखान यास मारिलें आणि पौष मासीं रुस्तुमज खानाचा मोडकेला व माघमासीं विजापुरकराशीं सामना केला.


  • शिवाजी महाराज अफझुलखानाशीं एकांत करण्यास बसले ते समयीं तंबूबाहेर दरवाज्यासमोर आपआपल्या धन्याचे शरीरावर नजर ठेवून दोही पक्षाकडे ( बॉडीगार्ड ) उभे होते अफझुलखानाचे अंगास सय्यदबंडा नांवाचा त्याचा नोकर उभा होता आणि शिवाजी महाराजां