जगदिश्वराचें देऊळ, त्यांत सांप्रत सर्व काळ चिखल सांचलेला असतो. हर, हर, केवढी ही दुःखद स्थीति तरी ! ! कोठवर वर्णन करावी ?
अहो, ज्या वीराविषयीं आम्ही मोठाले सभांत, भाषणांत, अभिमान बाळगून बोलत असतो कीं, तो वीर पुरुष आमच्या महाराष्ट्र देशांत व आमचे मराठ्यांचे कुळांत उत्पन्न झाला होता. अशा महायोध्याच्या समाधीची व त्यांनीं स्थापिलेल्या देवळाचीही दुःखद स्थीति कानांनी आह्मी ऐकावी! आणि स्वस्थ बसावेना? मला वाटतें कीं, खरे मराठ्यांस तर हें कधीं सहन होणार
नाहीं.
मी रायगडावर गेलों आणि महाराजांचे समाधीची व देवळाची ही स्थीति ज्या समयीं डोळ्यांनीं पाहिली त्या समयीं माझें अंगावर रोमांच उभे राहून मनास जी एक प्रकारची उदासिनता प्राप्त झाली ती येथें सांगतां येत नाहीं. माझी विचारशक्ति स्तब्ध होऊन घटकाभर मी त्या महापुरुषाचे समाधी पुढें डोळे मिटून बसलों. थोडे वेळानें मनांत विचार आला कीं, किती तरी
आह्मी हिंदु अनुपकारी ? ज्या पुरुषाचे पायां पुढें हिंदुस्थानांतील सर्व हिंदुराजांनीं आपले मुंगूट नमवावें, अशी ज्याची योग्यता ! त्याच्या समाधीची ही अशी दशा असावीना? आणि त्या विषयीं आह्मी हिंदु राजांनीं कांहींच करूंनये. एकूण मेल्यामागें कोणी कोणाचा नाहीं " शितें आहेत तोपर्यंत भोवतालीं भुतें आहेत. " असें साधुजन ह्मणतात तें खरें आहे.
पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/५१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४७)