Jump to content

पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४५ )

कांसव असावयाचें तेथील चिरे उखळले आहेत व कांसव नाहींसें करून टाकलें आहे. देवळावरील घुमट पाहिला असतां तो अगदीं ताबुतासारखा दिसतो. म्हणजे घुमटाचे चारी कोपऱ्यांस चार कळस असून मध्यें मोठा घुमट आहे. दुरून पाहिलें असतां अगदीं मशिदीसारखा भास होतो. देवळापुढील अंगणांत भव्य नंदी आहे. त्याची शिंगे वगैरे मोडून फोडून टाकलेलीं आहेत. देवळाचे तटाचे महादरवाज्यांतून बाहेर पडले असतां आपण शिवाजी महाराजांचे समाधीपाशीं येतो. येथें उजवे हाताकडे दरवाज्याचे भिंतीवर शिळालेख खालीं लिहिल्याप्रमाणें आहे.

     ॥ प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंदरोऽनुज्ञया ॥
     ॥ श्रीमछत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंव्हासने तिष्ठतः ॥
     ॥ शाके शाण्णव बाणभूमि गणना दानन्द संवत्सरे ॥
     ॥ ज्योतीराज मुहुर्त कीर्ति महिते शुक्लेश सार्पेतिथौ १
     ॥ वापी, कूप, तडाग, वाजि, रुचि रम्यं वनं वीतिके ॥
     ॥ स्तंभैः कुंभि गृहे नरेंद्र सदनै रंभ्रंलिहैमीहिते ॥
     ॥ श्रीमद्रायगिरौ गिराम विषये हो राजिना निर्मिते॥
     ॥ यावच्चंद्र दिवाकरों विलसत स्तावत्समुज्जृंभते ॥२॥