ह्मणजे रायगडाचे पायथ्यापाशीं पांचाड गांवाचे डोंगरांत प्रथम सांवतांची चौकी ह्मणून एक ठिकाण लागतें. त्या चौकीचे जोत्याची लांबी फूट २० व रुंदी फूट १५ आहे. ती चौकी टाकून डोंगरांत चढत गेलें असतां पुढें ज्या मोठे डोंगराचे शिखरावर रायगड हा किल्ला वसलेला आहे, त्या डोंगराचे कडसरीसच पांचाड नांवाचा गांव लागतो. या गांवीं अझून-जुन्यावाड्याचीं भिंताडें आहेत त्या ठिकाणास कोट असें ह्मणतात. या वाड्याचे चारी बाजूस तटबंदी असून त्याचे आंत पाण्याचीं टांकी, व घरांचीं जोतीं, जशींच्या तशींच अजून आहेत. तसेच हत्ती, व घोडे, बांधण्याच्या जागा आहेत. या स्थळीं पूर्वी श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाईसाहेब राहत असत; तटबंदीचें आंतील मुख्य घराचें जोतें २०० फूट लांब व ४० फूट रुंद असें आहे. तटाची एकंदर पूर्व बाजूची लांबी ४२० फूट व रुंदी दक्षिण उत्तर ३८० फूट आहे. तटाचे भिंताडाची जाडी ६ फूट आहे. उंची ८ फूट पासून १२ फूट पर्यंत जमिनीचे उंच सखल मानाप्रमाणें आहे. येथून पुढें किल्ल्याकडे जाऊं लागलें असतां हबशी कारकिर्दीतील दोन चौक्यांचीं जोतीं लागतात. त्यांची लांबी फूट ३० व रुंदी फूट १८ आहे. या ठिकाणीं रहाणाऱ्या हबशाचेंनांव याकुबखान असें होतें. तसेंच पुढे डोंगराचे खिंडीत जातांना चित दरवाजा ह्मणून लागतो. हा दरवाजा कोसळलेला असून त्याजवर बुरूज किंवा तटबंदी कांहीं एक
पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/३६
Appearance